कटिहार, 30 जुलै: गुरुवारी रात्री उशीरा महापौर शिवराज पासवान (Mayor Shivraj Paswan) यांची काही अज्ञातांनी गोळ्या घालून (Gun Firing) हत्या (Murder) केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपासाची चक्र फिरवत चार आरोपींना बेड्या ठोकल्या (4 arrest) आहेत. महापौर पासवान यांच्या हत्या प्रकरणात एका BJP आमदाराच्या (BJP MLA) नातेवाईकाचं नाव समोर आलं आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याची माहिती समोर आली नाही, पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
BJP आमदार कविता पासवान (Kavita Paswan) यांच्या भाच्यासोबत 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 8 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. जमीन खरेदी विक्रीच्या कारणांतून महापौर शिवराज पासवान यांची हत्या झाली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. याच अनुषंगानं पोलीस तपास करत आहेत. पुढील 48 तासांत हत्येचा खुलासा केला जाईल. अटक केलेले सर्व आरोपी कटिहार शहराच्या आसपासच्या परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही वाचा-विरारमध्ये बँकेवर दरोडा; एका महिलेचा मृत्यू, बँकेच्या माजी अधिकाऱ्यानेच रचला कट
नेमकं प्रकरण काय आहे?
बिहार राज्यातील कटिहार येथील महापौर शिवराज पासवान ऊर्फ शिवा पासवान यांची गुरुवारी रात्री काही अज्ञात तरुणांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. मृत पासवान हे गुरुवारी रात्री काम उरकून दुचाकीनं आपल्या घरी येत होते. दरम्यान वाटेत निर्मनुष्य ठिकाणी काही अज्ञात आरोपी दबा धरून बसले होते. पासवान संतोषी चौक रेल्वे गेट परिसरात पोहोचताच आरोपींनी त्यांच्यावर ताबडतोब हल्ला केला. हल्लेखोरांनी पासवान यांच्या दिशेनं अनेक गोळ्या झाडल्या यातील तीन गोळ्या पासवान यांच्या छातीत लागल्या.
हेही वाचा-VIDEO: मुसळधार पावसात वाहत होता रक्ताचा पाट; तरुणांनी तलवारीने केले सपासप वार
गंभीररित्या जखमी झालेल्या पासवान यांना रात्री उशीरा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. पण तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेची माहिती शहरात वाऱ्याच्या वेगानं पसरली. यामुळे नातेवाईकांसह समर्थकांनी मेडिकल कॉलेज रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या हत्याकांडात बीजेपी आमदार कविता पासवान यांच्या भाचाचं कनेक्शन असल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.