मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /विरारमध्ये ICICI बँकेवर दरोडा; हल्ल्यात महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, एकाला अटक

विरारमध्ये ICICI बँकेवर दरोडा; हल्ल्यात महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू, एकाला अटक

Robbery at ICICI Bank Virar: विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Robbery at ICICI Bank Virar: विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Robbery at ICICI Bank Virar: विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या शाखेवर सशस्त्र दरोडा टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

विरार, 30 जुलै : विरारमधील आयसीआयसीआय बँकेच्या (ICICI Bank Virar) शाखेवर सशस्त्र दरोडा (Robbery) टाकण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुरुवारी (29 जुलै 2021) रात्री साधारण 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या त्यापैकी एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू (Woman employee died) झाला असल्याची माहिती समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बँक बंद झाल्यावर इतर कर्मचारी निघून गेले तर बँकेच्या असिस्टंट मॅनेजर आणि इतर दोन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी दोन दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या हल्ल्यात दोन महिला कर्मचारी जखमी झाल्या.

परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ; आणखी एक खंडणीचा गुन्हा दाखल

पळून जाताना एकाला अटक

दोन दरोडेखोरांनी हा सशस्त्र दरोडा टाकला. दरोडेखोर हे सोने आणि पैशाची बॅग घेऊन फरार होत होते. मात्र, बँकेत झालेल्या गोंधळ ऐकूण घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी एका दरोडेखोराला पकडले. त्यानंतर नागरिकांनी या दरोडेखोराला पोलिसांच्या ताब्यात दिले.

माजी कर्मचाऱ्यानेच रचला कट

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अटक करण्यात आलेला दरोडेखोर हा बँकेचाच माजी कर्मचारी असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, दरोडेखोरांच्या हल्ल्यात बँकेच्या असिस्टंट मॅनेजरचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या जखमी महिला कर्मचारीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime, Virar