मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार, नाना पटोलेंची घोषणा

हिवाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षपदाची निवड होणार, नाना पटोलेंची घोषणा

' हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल'

' हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल'

' हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल'

  • Published by:  sachin Salve

 मुंबई, 03 डिसेंबर :  मागील अधिवेशनापासून विधानसभा अध्यक्षपदाच्या  निवडीचा  (Assembly Speaker) मुद्दा रखडलेला आहे. पण, आता  विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड डिसेंबर महिन्यात होत असलेल्या हिवाळी अधिवेशनातच (winter season in maharashtra 2021) होईल व अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच होईल, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी स्पष्ट केलं आहे.

मुंबईमधील  टिळक भवन येथे प्रसिद्धी माध्यमांशी बोलत असताना  नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबद्दल भाष्य केले आहे.

'कोरोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अध्यक्षपदाच्या  निवड प्रक्रियेसाठी तीन दिवसांची कालावधी लागतो. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल. आवाजी मतदानाने निवड होण्याची पद्धत देशभर सर्वच राज्यात आहे त्यात काही गैर नाही. विधानसभेने त्यांच्या नियमावलीत बदल केलेला आहे. महाराष्ट्रातही विधान परिषदेच्या सभापतीपदाची निवड याच पद्धतीने होत असते त्यामुळे यावर आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, असं नाना पटोले म्हणाले.

'...तर एसटी कर्मचाऱ्यांवर कठोरातली कठोर कारवाई करु', अनिल परबांचा मोठा इशारा

अमरावती दंगलीप्रकरणी फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, 'अमरावती दंगलीत भाजपाचे आमदार व नेतेच सक्रीय होते, भाजपाच्या नेत्यांनीच चिथावणी देणारी विधाने केली. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर अमरावती दंगलीचे खापर फोडणे चुकीचे आहे. राहुल गांधी यांची बदनामी करण्याचा हा प्रयत्न आहे व असा प्रयत्न भाजपाकडून सातत्याने होत आहे'

तुम्हीही प्रेशरकुकरमध्ये शिजवलेला भात खाता ना? या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात

तसंच, राहुल गांधी यांच्याविषयी बोलण्याचा फडणवीस यांना नैतिक अधिकार नाही. गांधी कुटुंबाने देशासाठी त्याग केला आहे, बलिदान दिले आहे, भाजपाने देशासाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करून देश विकणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, असा सणसणीत टोला पटोले यांनी लगावला.

विधानसभा अध्यक्ष कोण होणार?

नाना पटोले यांची नियुक्ती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी झाल्यानंतर रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर निवडणूक घेण्याचा मुद्दा पावसाळी अधिवेशनात रखडला होता. त्यावेळी काँग्रेसच्या वाट्याला असलेलं विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्र पृथ्वीराज चव्हाण आणि पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांची नाव समोर आली होती.  पण, अजूनही अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे अध्यक्षपदी कोण विराजमान होणार हे पाहण्याचे ठरणार आहे.

First published: