Home /News /national /

धाकधूक वाढली, SDM कॉलेजमध्ये एका आठवड्यात तब्बल 281 नवे कोरोनाबाधित

धाकधूक वाढली, SDM कॉलेजमध्ये एका आठवड्यात तब्बल 281 नवे कोरोनाबाधित

भारतातली कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या (Karnataka) धारवाड (Dharwad) येथील एसडीएम मेडिकल कॉलेमध्ये (SDM Medical College) एका आठवड्यात तब्बल 281 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patints) आढळले आहेत.

पुढे वाचा ...
  बंगळुरु, 27 नोव्हेंबर : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा (Corona Virus) ओमिक्रॉन (Omicron) नावाचा नवा व्हेरिएंट (variant) आढळल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे भारतातली कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत असताना एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. कर्नाटकच्या (Karnataka) धारवाड (Dharwad) येथील एसडीएम मेडिकल कॉलेमध्ये (SDM Medical College) एका आठवड्यात तब्बल 281 नवे कोरोनाबाधित रुग्ण (Corona Positive Patints) आढळले आहेत. त्यामुळे प्रशासनाची धाकधूक वाढली आहे. विशेष म्हणजे काल शुक्रवारी (26 नोव्हेंबर) 99 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे या महाविद्यालयात बाधित असलेले विद्यार्थी, शिक्षण आणि कर्मचाऱ्यांची संख्या थेट 281 वर पोहोचली. पण या सर्वांपैकी फक्त 6 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे (COVID symptoms) आढळल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

  अचानक रुग्णवाढ होण्यामागील नेमकं कारण काय?

  धारवाड येथील मेडिकल कॉलेजच्या या घटनेची दखल कर्नाटक सरकारने देखील घेतली आहे. कर्नाटकचे आरोग्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहेत. "मला अधिकाऱ्यांच्या माध्यमातून माहिती मिळाली की संबंधित महाविद्यालयात एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर या महाविद्यालयात कोरोनाबाधितांची संख्या वाढली. पण सध्यातरी आम्ही राज्यात कोणत्याही प्रकारचे निर्बंध लागू करु शकत नाहीत. राज्यात लग्न समारंभ आणि इतर अनेक कार्यक्रमही मोठ्या प्रमाणात आयोजित होत आहेत", अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री के सुधाकर यांनी दिली. हेही वाचा : Corona च्या नव्या व्हेरिएंटनं वाढवली मुंबईची चिंता, पालिकेची आज महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

  मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

  "केरळमधील कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. तसेच बंगळुरुच्या धारवाड येथील काही महाविद्यालयांमध्ये नव्या कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता मी आज आरोग्य विभाग आणि आपत्ती प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे", अशी माहिती मुख्यमंत्री बस्वराज बोम्मई यांनी दिली. हेही वाचा- CoronaVirus च्या नवीन व्हेरिएंट Omicron वर लस प्रभावी? फायझरनं दिलं उत्तर

  SDM महाविद्यालयापासून 500 मीटर अंतारावर असलेले सर्व शाळा-महाविद्यालये बंद

  एसडीएम महाविद्यालयात वाढत्या रुग्णांची संख्या पाहता प्रशासनाने तातडीने मोठा निर्णय घेतला. महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या 500 मीटर अंतरात असेलेले सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आले. तसेच महाविद्यालयाच्या आजूबाजूच्या परिसरात सॅनेटाईज करण्याचं काम सुरु करण्यात आलं आहे. तसेच महाविद्यालयाच्या प्रवेशाद्वारावर प्रतिबंध लावण्यात आले असून 8 रुग्णवाहिकांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे.
  Published by:Chetan Patil
  First published:

  पुढील बातम्या