मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Corona च्या नव्या व्हेरिएंटनं वाढवली मुंबईची चिंता, पालिकेची आज महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

Corona च्या नव्या व्हेरिएंटनं वाढवली मुंबईची चिंता, पालिकेची आज महत्त्वाची बैठक; मोठा निर्णय होण्याची शक्यता

कोरोनाच्या (Corona Virus) नव्या व्हेरिएंट (variant) ओमिक्रॉननं (Omicron) मुंबईचीही (Mumbai City) चिंता वाढवली आहे.

कोरोनाच्या (Corona Virus) नव्या व्हेरिएंट (variant) ओमिक्रॉननं (Omicron) मुंबईचीही (Mumbai City) चिंता वाढवली आहे.

कोरोनाच्या (Corona Virus) नव्या व्हेरिएंट (variant) ओमिक्रॉननं (Omicron) मुंबईचीही (Mumbai City) चिंता वाढवली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 27 नोव्हेंबर: कोरोनाच्या (Corona Virus) नव्या व्हेरिएंट (variant) ओमिक्रॉननं (Omicron) मुंबईचीही (Mumbai City) चिंता वाढवली आहे. त्यातच आता मुंबईतही या व्हेरिएंटचा सामना करण्यासाठी आधीपासून पावलं उचलण्यास सुरुवात झाली आहे. आज नव्या स्ट्रेनबाबत चर्चा आणि पुढील नियोजन कण्यासाठी मुंबई महापालिका (Mumbai Municipal Corporation) प्रशासनाची महत्वाची बैठक पार पडणार आहे.

आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने जगभरात चिंता वाढवली आहे. जगातले देश सतर्क झाले आहेत. कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ नये यासाठी कडक पावले उचलली जात असल्याचं चित्र आहे. राज्यातही सरकार सतर्क झालं आहे. त्यामुळे या व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारही सतर्क झाली आहे.

हेही वाचा- CoronaVirus च्या नवीन व्हेरिएंट Omicron वर लस प्रभावी? फायझरनं दिलं उत्तर

पालिकेच्या या बैठकीत नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरता काही महत्वाची पावलं उचलण्याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर मुंबई महापालिका प्रशासनाकडून बारीक नजर ठेवली जाण्यावर भर दिला असल्याचं समजतंय.

आज संध्याकाळी 5.30 वाजता ऑनलाईन पद्धतीनं महापालिका आयुक्त ही बैठक घेणार आहेत. या बैठकीला सर्व कोविड हॉस्पिटलचे डिन,टास्क फोर्स सदस्य, अतिरीक्त आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे मुंबईचीही चिंता वाढली आहे. येत्या नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर परदेशातून अनेक नागरिक भारतात येण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन करण्याचा पालिकेचा विचार असेल. तसंच दक्षिण आफ्रिकेत आलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटमुळे विमानसेवा बंद करण्याची कोणतंही मागणी नसल्यचां पालिकेनं स्पष्ट केलं आहे. परदेशामधून येणाऱ्या प्रवशांच्या जिनोम सिक्वेसींग टेस्ट करण्यावर पालिका भर देणार आहे.

हेही वाचा- IND vs NZ: कानपूर टेस्टच्या तिसऱ्या दिवशी विराट कोहलीच्या खास व्यक्तीची मैदानात एन्ट्री

युरोपीय देशांमध्ये करोनाचा उद्रेक वाढत असताना तेथून येणारे प्रवासी बाधित असल्याचे आढळल्यास त्यांच्या जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या (जिनोम सिक्वेन्सिंग) करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

तसंच या देशांमधील जिनोम सिक्वेन्सिंग अहवालही देण्याची मागणी करोना टास्क फोर्सकडे केली आहे.

सध्या रशिया, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, जर्मनी या देशांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव वेगाने होत आहे. या देशांमध्ये कोरोनाचे नवा व्हेरिएंट आढळल्यास त्यावर देखरेख ठेवणं गरजेचं आहे.

First published:

Tags: BMC, Coronavirus