मराठी बातम्या /बातम्या /देश /

CoronaVirus च्या नवीन व्हेरिएंट Omicron वर लस प्रभावी आहे का?, फायझरनं दिली महत्त्वाची माहिती

CoronaVirus च्या नवीन व्हेरिएंट Omicron वर लस प्रभावी आहे का?, फायझरनं दिली महत्त्वाची माहिती

सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

न्यूयॉर्क, 27 नोव्हेंबर: कोरोना व्हायरसच्या (Covid-19) नवीन व्हेरिएंट 'ओमिक्रॉन'नं (Omicron) जगभरातील लोकांची चिंता वाढवली आहे. प्राथमिक माहितीनुसार, शास्त्रज्ञ याला अत्यंत धोकादायक मानत आहेत. आफ्रिकन देशांमध्ये सापडलेल्या या नवीन व्हेरिएंटबद्दल असं म्हटलं जात आहे की, हा व्हेरिएंट लोकांमध्ये वेगानं संक्रमित करते. अशा परिस्थितीत सध्या कोरोनावर (Corona Virus) जी लस वापरली जात आहे ती ओमिक्रॉनलाही प्रतिरोधक आहे का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

यावर अमेरिकन कंपनी फायझरने म्हटलं आहे की, सध्या काहीही स्पष्टपणे सांगता येणार नाही. मात्र, येत्या 100 दिवसांत यासाठी नवीन लस तयार करणार असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे.

हेही वाचा-  IND vs NZ: श्रेयस अय्यरच्या बहिणीचीही भावाइतकीच चर्चा, वाचा कोणत्या क्षेत्रात आहे प्रसिद्ध

अमेरिकेच्या CBC न्यूजनुसार, फायझरने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनात फायझरनं म्हटलं आहे की, ते सध्या ओमिक्रॉन विरुद्धच्या सध्याच्या लसीची चाचणी करत आहेत. कंपनीच्या म्हणण्यानुसार, जर ती प्रभावी ठरली नाही, तर सध्याच्या लसीमध्ये काही बदल करून नवीन लस तयार केली जाईल. रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, चाचणीचे निकाल येत्या दोन आठवड्यांत समोर येतील.

ओमिक्रॉन अधिक धोकादायक

दक्षिण आफ्रिकेच्या आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितलं की, ओमिक्रॉनमध्ये मागील प्रकारांपेक्षा जास्त उत्परिवर्तन दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेतील साथीचे रोग विशेषज्ञ सलीम अब्दुल करीम यांनी सीबीएस न्यूजला सांगितलं की, नवीन व्हेरिएंटवरील विद्यमान लसी काम करत नाहीत ही चिंतेची बाब आहे. याशिवाय त्याचा प्रसारही झपाट्याने होत आहे. जर हा प्रकार डेल्टा पेक्षा जास्त किंवा अधिक वेगानं पसरला तर, अंदाज करणं फार कठीण जाईल, असं करीम म्हणाले.

हेही वाचा- वाईट! दलित नवरदेव घोड्यावर बसला म्हणून केली दगडफेक, 12 जण जखमी

नवीन व्हेरिएंटबद्दल चिंता

आम्ही तुम्हाला सांगतो की, कोरोनाच्या या नवीन व्हेरिएंटला आधी B.1.1.529 असं नाव देण्यात आलं होतं, मात्र आता WHO ने म्हटलं आहे की, ते Omicron म्हणून ओळखले जाईल. तसंच, 'व्हेरिएंट ऑफ कन्सर्न' या श्रेणीमध्ये ठेवण्यात आलं आहे. याचा अर्थ कोरोना व्हायरसच्या या नवीन व्हेरिएंटबाबत चिंता व्यक्त करण्यात आली असून येत्या काही दिवसांत त्यावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. WHO ने एका निवेदनात म्हटलं आहे की, ही चिंतेची बाब आहे की कोरोनाच्या या व्हेरिएंटमध्येही वेगानं उत्परिवर्तन होत आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Coronavirus