मराठी बातम्या /बातम्या /देश /शेतकऱ्याच्या प्रश्नावर भडकले मंत्रीमहोदय, 'यापेक्षा तुम्ही मरा!'- दिलं संतापजनक उत्तर!

शेतकऱ्याच्या प्रश्नावर भडकले मंत्रीमहोदय, 'यापेक्षा तुम्ही मरा!'- दिलं संतापजनक उत्तर!

कर्नाटक सरकारमधील मंत्री उमेश कट्टी (Umesh Katti) एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये ते एका नाराज शेतकऱ्याला असं म्हणत आहे की यापेक्षा तुम्ही मरा.

कर्नाटक सरकारमधील मंत्री उमेश कट्टी (Umesh Katti) एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये ते एका नाराज शेतकऱ्याला असं म्हणत आहे की यापेक्षा तुम्ही मरा.

कर्नाटक सरकारमधील मंत्री उमेश कट्टी (Umesh Katti) एका कथित ऑडिओ क्लिपमुळे चर्चेत आहेत. ज्यामध्ये ते एका नाराज शेतकऱ्याला असं म्हणत आहे की यापेक्षा तुम्ही मरा.

बेंगळुरू, 29 एप्रिल: एका कथित ऑडिओ क्लिपमुळे कर्नाटक सरकारमधील (Karnataka Government) मंत्री उमेश कट्टी (Umesh Katti) वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. या ऑडिओ क्लिपमध्ये ते एका नाराज शेतकऱ्याला असं म्हणत आहे की यापेक्षा चांगलं आहे की तुम्ही मरा. या व्हायरल ऑडिओनंतर विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये संताप पाहायला मिळतो आहे. विरोधी पक्षाकडून कट्टी यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे.

अशी माहिती समोर आली आहे की, पीडीएस प्रणालीअंतर्गत देण्यात येणाऱ्या तांदळाचं प्रमाण 5 किलोवरुन 2 किलो केल्याने नाराज शेतकऱ्याने त्याबाबतत विचारणा करण्यासाठी उमेश कट्टी यांना फोन केला होता. ऑडिओमध्ये तो शेतकरी असं म्हणतो आहे गेल्यावर्षी काम सुटल्यामुळे अनेक लोकं या निर्णयावर चिंताग्रस्त आहेत. यावर मंत्री कट्टी यांनी असं उत्तर दिलं की धान्याचं वितरण लवकरत वाढवण्यात येणार आहे. केंद्र सरकारने धान्याच्या आणखी पुरवठ्याचं आश्वासन दिलं आहे. जेव्हा यावर शेतकऱ्याने विचारलं की हे कधीपर्यंत होईल तेव्हा कट्टी म्हणाले की पुढील महिन्यापर्यंत.

(हे वाचा-कुंभनगरीत पाप! बाजारात विकलं जातंय Duplicate Remdesivir; पोलिसांनी केला पर्दाफाश)

मंत्र्यांच्या या उत्तरावर नाराज झालेल्या शेतकऱ्याने असा प्रश्न विचारला की तोपर्यंत आम्ही परिस्थिती कशी सांभाळू? काय आम्ही मरून जायचं का? या प्रश्नांमुळे वैतागलेल्या मंत्र्यांनी असं उत्तर दिल की, चांगलं आहे की तुम्ही मरून जा.

मंत्र्यांचं स्पष्टीकरण

या घटनेनंतर कट्टी यांचं स्पष्टीकरण देखील विचित्र आहे. त्यांनी असं म्हटलं आहे की कुणाला असे प्रश्नच विचारायला नाही पाहिजे. जर त्याने म्हटलं की मरून जाईल तर मी काय करू शकतो. जर एखाद्याने मला व्यवस्थित प्रश्न विचारला तर मी व्यवस्थित उत्तर देईन.

(हे वाचा-दिल्लीतील कोरोना स्थितीवरुन हाटकोर्टाचे केजरीवाल सरकारला खडेबोल )

जेव्हा काही पत्रकारांनी उमेश कट्टी यांना असं म्हटलं की त्यांनी त्या शेतकऱ्याला असं म्हणायला हवं होतं की त्याने जीव देऊ नये आणि त्याला सरकारी मदतीचं आश्वासन द्यायला हवं होतं. यावर कट्टी यांनी असं उत्तर दिलं की माझ्याकडे इतकं मोठ हृदय नाही आहे, मी छोट्या मनाचा माणूस आहे.

(दीपा बालाकृष्णन यांच्या स्टोरीतील इनपुटसह, पूर्ण स्टोरीसाठी इथे क्लिक करा)

First published:

Tags: Karnataka, Karnataka government