मराठी बातम्या /बातम्या /देश /'तुम्हाला कोविडची परिस्थिती हाताळता येत नसेल, तर आम्ही केंद्राला सांगतो'; कोर्टाचे दिल्ली सरकारवर ताशेरे

'तुम्हाला कोविडची परिस्थिती हाताळता येत नसेल, तर आम्ही केंद्राला सांगतो'; कोर्टाचे दिल्ली सरकारवर ताशेरे

दिल्लीतल्या हॉस्पिटल्समध्ये मेडिकल ऑक्सिजनचा (Medical Oxygen) प्रचंड तुटवडा भासत आहे.

दिल्लीतल्या हॉस्पिटल्समध्ये मेडिकल ऑक्सिजनचा (Medical Oxygen) प्रचंड तुटवडा भासत आहे.

दिल्लीतल्या हॉस्पिटल्समध्ये मेडिकल ऑक्सिजनचा (Medical Oxygen) प्रचंड तुटवडा भासत आहे.

    नवी दिल्ली, 28 एप्रिल : देशाच्या राजधानीतली कोरोना संसर्गाची स्थिती (Corona pandemic) हाताळण्याच्या पद्धतीवरून आणि मेडिकल ऑक्सिजनच्या (Medical Oxygen) पुरवठ्यावरून दिल्ली हायकोर्टाने (Delhi High Court) मंगळवारी (27 एप्रिल) दिल्ली सरकारचे कान पिळले. 'दिल्ली सरकार ही परिस्थिती हाताळू शकत नसेल, तर आम्ही केंद्र सरकारला सांगून त्यांच्या ऑफिसर्सना कार्यभार हाती घ्यायला सांगू,' अशी तंबी हायकोर्टाने दिली.

    रेमडेसिवीर सारखी (Remdesivir) औषधं, तसंच मेडिकल ऑक्सिजन आदींच्या तुटवड्या संदर्भात हॉस्पिटल्सनी दाखल केलेल्या याचिकेवर न्या. विपिन संघी आणि न्या. रेखापल्ली (Justices Vipin Sanghi and Rekha Palli) यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. 'तुमच्या राज्यातली व्यवस्था सुरळीत करा. आता (खेळ) पुरे झाले. इनफ इज इनफ,' अशा शब्दांत कोर्टाने दिल्ली सरकारला आदेश दिले. 'लाइव्ह लॉ'च्या हवाल्याने 'स्क्रोल डॉट इन'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

    दिल्लीतल्या हॉस्पिटल्समध्ये मेडिकल ऑक्सिजनचा (Medical Oxygen) प्रचंड तुटवडा भासत आहे. 23 एप्रिलच्या रात्री सर गंगा राम हॉस्पिटलमध्ये जवळपास 25 गंभीर कोरोना बाधितांचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे एका रात्रीत मृत्यू झाला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयपूर गोल्डन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे (Oxygen Shortage) 20 जणांचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात अनेक हॉस्पिटल्सनी सोशल मीडियावर आपली गाऱ्हाणी मांडली. सरकारने ऑक्सिजन पुरवठा करावा, नाही तर आम्ही नव्या रुग्णांना दाखल करून घेणार नाही, असा इशाराही हॉस्पिटल्सनी दिला.

    वाचा: Covishield आणखी स्वस्त; Serum institute ने जारी केली कोरोना लशीची नवी किंमत

    कोर्टाने दिल्ली सरकारला सांगितलं, 'तुम्ही वाढत्या कोरोना बाधितांची स्थिती हाताळू शकत नाही आहात. तुमची यंत्रणा अपयशी ठरली आहे. ऑक्सिजनचा काळाबाजार सुरूच आहे. लोक ऑक्सिजन कसा घेऊ शकतात? मोठ्या प्रमाणावर साठेबाजी सुरू आहे आणि तुम्ही त्यावर कारवाई करत नाही आहात. त्यांच्यावर कारवाई करा.'

    'पाच ऑक्सिजन रिफिलर्स विरोधात कारवाईचे आदेश आम्ही देत आहोत. तसंच, कोर्टाच्या अवमानाची नोटीसही त्यांना द्यावी. कारण त्यांना बोलावूनही ते इथे हजर झाले नाहीत. सिलिंडरच्या व्यवसायात गोंधळ माजला आहे. तुम्ही त्यात लक्ष घालून व्यवस्था सुरळीत केली पाहिजे. तुम्ही बेफिकिरी दाखवलीत, तर तेही बेफिकिरीच दाखवणार. ते लोकांच्या आयुष्याशी अशा प्रकारे खेळणार असतील, तर त्यांना कोठडीत टाका,' असे आदेश कोर्टाने दिले.

    वाचा: सत्ताधारी भाजप आमदारालाच 24 तास मिळाला नाही ICU बेड; कोरोनाने झाला मृत्यू

    ऑक्सिजन रिफिलिंग प्लांटवर सरकारी अधिकारी पाठवून गरज पडल्यास त्यांचा तातडीने ताबा घेण्याचे आदेशही कोर्टाने दिल्ली सरकारला दिले. त्यांना कोठडीत टाकायचे अधिकार तुम्हाला कोर्टाने दिले आहेत, असंही कोर्टाने सांगितलं.

    दिल्लीत सोमवारी (26एप्रिल) 20,201 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली. तिथल्या आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या 10,47916 झाली आहे. आतापर्यंत 14,628 जणांचा बळी गेला आहे.

    मंगळवारी सकाळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं, की सरकार फ्रान्समधून 21 ऑक्सिजन प्लांट्सची (Oxygen Plants) आयात करणार असून, थायलंडमधून 18 क्रायोजेनिक टँकर्स आणणार आहे. टँकर्सची कमतरता असल्यामुळे दिल्ली सरकारला केंद्राकडून होत असणाऱ्या ऑक्सिजन वाटपात अडचणी येत असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Coronavirus, Delhi, Delhi high court