नवी दिल्ली, 30 डिसेंबर: महात्मा गांधीं (Mahatma Gandhi) बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण महाराजांना (Kalicharan On Mahatma Gandhi) अटक करण्यात आली आहे. रायपूर पोलिसांनी कालीचरण महाराजांना खजुराहो येथील हॉटेलमधून अटक केली आहे. पोलिस दुपारपर्यंत कालीचरणला रायपूरला घेऊन जातील. महाराज कालीचरण यांच्यावर टिकरापारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित धर्मसंसद 2021चा कार्यक्रमा दरम्यान, शेवटच्या दिवशी संत कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल अपशब्द वापरत देशाच्या फाळणीसाठी बापूंनाही जबाबदार धरले. कालीचरण यांचे वादग्रस्त विधान व्हायरल झाल्यानंतर कालीचरण यांच्यावर रायपूरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Chhattisgarh | Kalicharan Maharaj was staying in a rented accommodation near Bageshwar Dham, 25 km from Khajuraho in Madhya Pradesh. Raipur Police arrested him at 4 am today. By late evening, the police team will reach Raipur with the accused: SP Raipur Prashant Agarwal
— ANI (@ANI) December 30, 2021
रायपूर शहरातील रावण भटा मैदानावर दोन दिवसीय धर्मसंसद कार्यक्रमाच्या समारोपावेळी कालीचरण म्हणाले, इस्लामचे ध्येय राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर कब्जा करणं आहे. 1947 मध्ये आमच्या डोळ्यांसमोर त्यांनी कब्जा केला होता, असंही ते म्हणाले. आधी इराण, इराक आणि अफगाणिस्तान ताब्यात घेतलं. राजकारणाच्या जोरावर त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान काबीज केलं. मोहनदास करमचंद गांधी यांची हत्या केल्याबद्दल मी नथुराम गोडसेला सलाम करतो. असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी यावेळी केले होते.
नवीन वर्षात पेट्रोल 25 रुपयांनी स्वस्त, या राज्याच्या CMचं जनतेला मोठं गिफ्ट
कालीचरण यांच्या या वादग्रस्त विधानावर (Controversial Statement of Saint Kalicharan) काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्यावर टीका केली आहे. महात्मा गांधींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस नेते आणि रायपूर महानगरपालिकेचे अध्यक्ष प्रमोद दुबे यांच्या तक्रारीनंतर कालीचरण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.