रांची, 29 डिसेंबर: देशातील वाढत्या पेट्रोलच्या किमतींदरम्यान (Petrol Price in India Today) झारखंडवासीयांसाठी आनंदाची बातमी आहे. झारखंडमधील हेमंत सोरेन सरकारने नववर्षानिमित्त राज्यातील जनतेला मोठी भेट दिली आहे. हेमंत सोरेन सरकारने राज्यात पेट्रोलच्या दरात 25 रुपयांनी (Petrol Price Slashed by 25 rupees in Jharkhand) कपात करण्याची घोषणा केली आहे. मात्र, हेमंत सोरेन सरकारने हा दिलासा केवळ दुचाकी वाहनांसाठी दिला आहे. बुधवारी झारखंड सरकारला 2 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या (CMO Jharkhand Twitter) ट्विटर हँडलवरून ट्वीट करुन याबाबत माहिती देण्यात आली आहे. या ट्वीटमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, आता राज्यातील दुचाकी वाहनांना पेट्रोलवर प्रतिलीटर 25 रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
काय आहे मुख्यमंत्री कार्यलयाचे ट्वीट?
झारखंडच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ट्वीटमध्ये असे म्हटले आहे की, 'पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे, त्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोक सर्वाधिक त्रस्त आहेत. त्यामुळे सरकार राज्यस्तरावरून दुचाकी वाहनांसाठी पेट्रोलवर ₹25 प्रति लीटरची सवलत देणार आहे, त्याचा फायदा 26 जानेवारी 2022 पासून सुरू होईल.- श्री हेमंत सोरेन'
पेट्रोल-डीजल के मूल्य में लगातार इजाफा हो रहा है, इससे गरीब और मध्यम वर्ग के लोग सबसे अधिक प्रभावित हैं। इसलिए सरकार ने राज्य स्तर से दुपहिया वाहन के लिए पेट्रोल पर प्रति लीटर ₹25 की राहत देगी, इसका लाभ 26 जनवरी 2022 से मिलना शुरू होगा:- श्री @HemantSorenJMM pic.twitter.com/MsinoGS60Y
— Office of Chief Minister, Jharkhand (@JharkhandCMO) December 29, 2021
झारखंड पेट्रोलियम डीलर्स असोसिएशननेही पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट दर कमी करण्याची मागणी सातत्याने केली होती. पेट्रोलवरील 5 टक्के व्हॅट कमी करण्याची त्यांची मागणी होती. सरकारने व्हॅटचा दर 22 टक्क्यांवरून 17 टक्क्यांवर आणल्यास लोकांना मोठा दिलासा मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol and Diesel price cut