जाहिरात
मराठी बातम्या / देश / गाडलेला मृतदेह काढून खातो मांस, मांजरीसारखा दिसणाऱ्या 'बिज्जू' आहे तरी कोण? जाणून घ्या रंजक माहिती

गाडलेला मृतदेह काढून खातो मांस, मांजरीसारखा दिसणाऱ्या 'बिज्जू' आहे तरी कोण? जाणून घ्या रंजक माहिती

( बिज्जू हा गुहेसारख्या ठिकाणी राहतो )

( बिज्जू हा गुहेसारख्या ठिकाणी राहतो )

मांजरासारखं दिसणाऱ्या या प्राण्याला कबर बिज्जू असं म्हणतात. जोधपूरमधील माचिया बायोलॉजिकल पार्कमध्ये हा प्राणी आणण्यात आला आहे.

  • -MIN READ Local18 Jodhpur,Rajasthan
  • Last Updated :

पुनीत माथूर, प्रतिनिधी जोधपूर, 19 मे: निसर्गात अनेकविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि जीव-जंतू आहेत. भारतात असा एक प्राणी आहे ज्याच्या नावातच कबर आहे. त्याचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी लोकांच्या मनात एक अज्ञात भीती घर करून बसते. पण तो एक निष्पाप प्राणी असून अंधाऱ्या ठिकाणी माणसांपासून दूर राहतो. नुकताच एक बिज्जू जोधपूरमधील माचिया बायोलॉजिकल पार्कमध्ये आणण्यात आला आहे. सध्या लोकांना पाहता यावं म्हणून त्याला वेगळं ठेवण्यात आलंय. याच ठिकाणी एक मादी बिज्जूही असून तीही लोकांच्या आकर्षणाचा केंद्र ठरतेय. या प्राण्याची नेमकी काय कथा आहे आणि तो लोकांपासून दूर का राहतो? हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लोकांनीच दिलं कबर बिज्जू नाव मांजरासारखं दिसणाऱ्या या प्राण्याला कबर बिज्जू असं म्हणतात. मुळात कबर हा शब्द लोकांनीच त्याच्या नावापुढं जोडला आणि सांगितलं जाऊ लागलं की हा प्राणी, कबर खोदून प्रेत बाहेर काढतो आणि त्याचं मांस खातो. याला केवळ बिज्जू नावानंच ओळखलं जातं. हा एक निशाचर प्राणी आहे. तो सहसा खोलवर राहतो आणि फक्त रात्रीच्या वेळी बाहेर पडतो. बिज्जू हा सस्तन प्राणी आहे आणि सर्वभक्षी आहे. म्हणजेच तो गवत आणि पेंढा खातो आणि लहान प्राणी, म्हणजे सरड्यांची अंडी आणि कुजलेले मांस देखील खातो.

News18लोकमत
News18लोकमत

रात्रीच्या अंधारात करतो शिकार असं म्हटले जातं की, बिज्जू हा गुहेसारख्या ठिकाणी राहतो आणि अनेक मोठ्या वटवृक्षांच्या आश्रयाला देखील राहतो. त्याला एकांत पसंत आहे. त्यामुळे रात्रीच्या अंधारातच तो शिकार करतो. बिज्जूचं आयुष्य 20 वर्षांचं आहे. तर वजन दीड ते 4 किलोपर्यंत असतं. घरात सापडला 15 वर्षांचा कोब्रा, शेपटी पकडली तर बुटाला घेतला चावा, PHOTOS छत्तीसगडमधून आणला बिज्जू जोधपूरच्या माचिया सफारी पार्कमध्ये एक मादी कबर बिज्जू आहे आणि ती काही काळ एकांतात आहे. त्यासाठी माचिया सफारी पार्क व्यवस्थापनाने छत्तीसगडमधून नर बिज्जू आणला आहे. आता त्याला 21 दिवसांसाठी अलग ठेवण्यात आले आहे. जेणेकरून कोणताही संसर्ग होऊ नये आणि त्यानंतर दोघांना एकत्र ठेवले जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात