घरात सापडला 15 वर्षांचा कोब्रा, शेपटी पकडली तर बुटाला घेतला चावा, PHOTOS
indian king cobra : साप दिसला तर भल्या भल्यांचा पळता भुई होतो. पण एका घरामध्ये भलामोठा असा इंडियन किंग कोब्रा साप आढळून आला. भलामोठा साप पाहून घरातील सदस्यांची बोबडीच वळाली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावलं, पण त्याच्या पायाला कडाडून त्याने चावा घेतला. (अंकित कुमार सिंह, प्रतिनिधी)
साप दिसला तर भल्या भल्यांचा पळता भुई होतो. पण एका घरामध्ये भलामोठा असा इंडियन किंग कोब्रा साप आढळून आला. भलामोठा साप पाहून घरातील सदस्यांची बोबडीच वळाली. त्यानंतर सर्पमित्राला बोलावलं, पण त्याच्या पायाला कडाडून त्याने चावा घेतला.
2/ 9
बिहार येथील सिवान जिल्ह्यातील रघुनाथपूर प्रखंड येथील गभीरार गावात हा प्रकार घडला. रामदेव यादव यांच्या घरी हा इंडियन कोब्रा साप सापडला.
3/ 9
रामदेव यादव यांच्या घरात लाकडांच्या फळ्या ठेवण्यात आल्या होत्या. त्याच लाकडांच्या फळ्याच्या आत कोब्रा लपून बसला होता. घरातल्या लोकांना सापाचा आवाज आला. लाकडांच्या फळ्या खाली भलामोठा कोब्रा दिसून आला.
4/ 9
तिथेच काही लहान पोरं खेळत होती, घरातल्या लोकांना आधी गंमत वाटली. पण जेव्हा सापाने एका उंदराला पकडलं आणि मग काय, सगळ्यांनी बाहेर पळ काढला. साप साप म्हणत गावात बातमी वाऱ्यासारखी पसरली. लोकांनी एकच गर्दी केली.
5/ 9
त्यामुळे लगेच सर्पमित्र रोहित रंजन यांना फोन करण्यात आला. सर्पमित्राने घरी धाव घेतली. लाकडाच्या फळी खाली पाहिलं तर भलामोठा कोब्रा फणा काढून बसलेला होता.
6/ 9
रोहित रंजन हे गेल्या 8 वर्षांपासून साप पकडण्याचे काम करत आहे. पण आज ज्या सापाला सामना झाला तो अत्यंत घातक आणि विषारी होता. या सापचं वय हे 15 वर्ष असल्याचं समोर आलं.
7/ 9
सापाचं वय जास्त असल्यामुळे त्याच्यामध्ये विष जास्त असल्याची शक्यता होती. त्यामुळे या किंग कोब्राला पकडणे फार कठीण होते. जर सापाने दंश केलं तर 2 ते 3 तासात मृत्यू झाला असता.
8/ 9
अखेर रंजन यांनी मोठ्या हिंमतीने लाकडांच्या फळ्यातून कोब्राला बाहेर काढलं. पण, बाहेर आल्यावर त्याने बुटाला कडाडून चावा घेतला. बुटाला चावा घेताच विष पसरलं होतं.
9/ 9
पण, सुदैवाने सापाचा दंश हा बुटाच्या आतपर्यंत पोहोचू शकला नाही. कोब्राला मैदानात आणण्यात आलं आणि त्यानंतर एका प्लास्टिकच्या बरणीमध्ये बंद करण्यात आलं. कोब्रा पकडल्यानंतर यादव कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास सोडला. सापाला पकडून नंतर जंगलात सोडण्यात आलं आहे.