जाहिरात
मराठी बातम्या / देश / महिलेची करुण कहाणी! बकरी विकून घरी आणावं लागलं नवऱ्याचं शव

महिलेची करुण कहाणी! बकरी विकून घरी आणावं लागलं नवऱ्याचं शव

महिलेची करुण कहाणी! बकरी विकून घरी आणावं लागलं नवऱ्याचं शव

नवऱ्याचा मृतदेह घरी आणण्यासाठी देखील या महिलेकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिला बकरी विकून मिळालेल्या पैशातून नवऱ्याचं शव घरी आणावं लागलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

लातेहार, 12 मार्च : पैशांची चणचण एखाद्या व्यक्तीच्या जीवावर बेतू शकते, याचं आणखी एक उदाहरण समोर येत आहे. पैशांच्या कमतरतेमुळे नवऱ्याच्या औषधोपचारासाठी पैसे नव्हते आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याहूनही वाईट म्हणजे नवऱ्याचा मृतदेह घरी आणण्यासाठी देखील या महिलेकडे पैसे नव्हते. त्यामुळे तिला बकरी विकून मिळालेल्या पैशातून नवऱ्याचं शव घरी आणावं लागलं आहे. ही घटना आहे झारखंडमधील लातेहार याठिकाणची. चरकी देवी या महिलेचा नवरा देवचरण सिंहवर तरसाने हल्ला केला होता. त्यांनी प्रतिकार केल्यानंतर तरस पळून गेला, मात्र देवचरण या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झाले होते. त्यांना रांची येथील रिम्स (RIMS) रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं होतं. दोन आठवड्यापर्यंत त्यांच्यावर उपचार झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

News18

पैशांची कमतरता तर होतीच पण त्याचबरोबर वनविभाग आणि रिम्स रुग्णालयाकडून झालेली बेपर्वाई यामुळे देवचरण यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांची पत्नी चरकी देवी यांनी केला आहे. (हे वाचा- सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीला दिला धोका, दागिन्यांसह लाखो रुपये घेऊन पत्नी फरार ) त्यांनी सांगितलं की, पैशांच्या कमतरतेमुळे औषधं खरेदी करणं देखील कठिण झालं होतं. त्यामुळे रुग्णालयात योग्य उपचार सुद्धा होत नव्हते. त्यांच्या उपचारासाठीच घरातील जनावरं विकावी लागली.  रिम्समधून मृतदेह घरी आणण्यासाठी रुग्णवाहिकेची मागणी केली, मात्र त्याकरता देखील वाहन नाही मिळालं. त्यामुळे नाईलाजास्तव तिच्या नातेवाईकांनी घरातील आणखी एक बकरी विकली आणि पैशांची व्यवस्था केली. त्यानंतरच रुग्णवाहिकेचं भाडं देण्यात आलं. या महिलेने दिलेल्या माहितीनुसार तिच्या नवऱ्याचा मृतदेह पंचनामा केल्याशिवायच आणण्यात आला आणि त्यावर अंत्यसंस्कार झाले. (हे वाचा- शेतकरी पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनंही उचललं ‘हे’ पाऊल, उघड्यावर आलं कुटुंब) रिम्स रुग्णालयाने या महिलेचे आरोप फेटाळले आहेत. ऑर्थोपेडिक्स विभागाध्यक्ष डॉ. एलबी माझी यांनी दिलेल्या माहितीनुसार ‘देवचरण यांच्या उपचारांमध्ये कोणतीच कमतरता नव्हती. मात्र त्यांच्या सेवेसाठी कुटुंबियांना स्वतंत्र नर्स हवी होती. रुग्णालयात नर्सेसची कमतरता असल्यामुळे ते शक्य नव्हतं’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात