मराठी बातम्या /बातम्या /देश /

सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीला दिला धोका, दागिन्यांसह लाखो रुपये घेऊन पत्नी फरार

सॉफ्टवेअर इंजिनीअर पतीला दिला धोका, दागिन्यांसह लाखो रुपये घेऊन पत्नी फरार

लग्नाच्या एक महिन्यातच पत्नी आपल्या आई-वडिलांसोबत फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

लग्नाच्या एक महिन्यातच पत्नी आपल्या आई-वडिलांसोबत फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

लग्नाच्या एक महिन्यातच पत्नी आपल्या आई-वडिलांसोबत फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

  • Published by:  Meenal Gangurde

नवी दिल्ली, 12 मार्च : 29 वर्षीय एका सॉफ्टवेअर इंजिनीअरने आपल्या पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. इंजिनीअरची पत्नी दागिने आणि 2.5 लाख रुपये घेऊन फरार झाली आहे. पत्नी एकटी नाही तर आपल्या आई-वडिलांसोबत फरार झाली आहे.

राहुल चोपडा नावाच्या या तरुणाने जानेवारी महिन्यात कशिश दुसेजा नावाच्या 27 वर्षीय मुलीशी विवाह केला होता. कशिशने लग्नाच्या वेळी ती दुसऱ्या मुलावर प्रेम करीत असल्याचे सांगितले नव्हते.

चिनप्पनहल्ली राहणारा आणि मूळचा हरियाणचा असलेला राहुल याने पत्नी कशिश व तिच्या आई-वडिलांविरोधात एचएएल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. राहुलने त्यांच्याविरोधात फसवणुकीचा आरोप केला आहे. राहुलने पोलिसांना सांगितले की, मी कशिशसोबत हरियाणा येथे अरेंज मॅरेज केलं होतं. त्यानंतर आम्ही एचएएल येथील एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला व सांगितले, तरुणीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेम संबंध होते आणि पतीला हे पत्नी फरार झाल्यानंतर कळाले. पतीला काहीही न सांगता कशिशने घरातील रोख आणि लग्नात मिळालेले दागिने घेऊन पळ काढला. तिच्यासोबत तिचे आई-वडिलही निघून गेले.

हे वाचा - अख्खं गाव खेळत होतं होळी आणि चिमुरडी नराधमांशी लढत राहिली, रुग्णालयात सोडला जीव

राहुलने सांगितले, ‘21 फेब्रुवारी रोजी कशिशचे आई-वडील घरी आले आणि सर्व दागिने आणि रोख पॅक करू लागले. मी विचारल्यानंतर त्यांनी शिवीगाळ सुरू केला. मी पोलिसांना याबाबत फोन करुन सांगितले. मात्र त्यापूर्वीच कशिश आपल्या आई-वडिलांसोबत हरियाणाला रवाना झाली होती. जेव्हा तिचा लॅपटॉप तपासला तेव्हा तिचे इतर मुलासोबतचे फोटो मला दिसले.’

First published:

Tags: Crime case, Crime news, Delhi