नवी दिल्ली 25 मे : कोरोना व्हायरसने सर्व जगालाच आपल्या वेठीला धरलं आहे. या व्हायरसला रोखण्यासाठी जगभरात लॉकडाऊन करण्यात आलं. भारतातही गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे सगळी अर्थव्यवस्था ठप्प पडलीय. गेल्या दोन महिन्याच्या काळात लोकांची मानसिकता तयार झाली आहे. त्यामुळे आता कोरोनासाठी मनाची तयारी झाली आहे. मात्र लॉकडाऊन नंतरचं आयुष्य, नोकरी, व्यवसाय याविषयी लोकांना सर्वात जास्त चिंता असल्याचं ‘IIM लखनऊ’ने केलेल्या अभ्यासात उघड झालं आहे. Understanding public sentiment during lockdown या विषयावर हा ऑनलाईन सर्व्हे घेण्यात आला होता. त्यात लोकांना आपल्या भविष्याविषयी सर्वात जास्त चिंता वाटत असल्याचं स्पष्ट झालंय. 79 टक्के लोकांना या गोष्टींची चिंता आहे. तर 40 टक्के लोकांच्या मनात भीती निर्माण झालीय. तर 22 टक्के लोक दु:खी आहेत. या सर्व्हेत 23 राज्यांतल्या 104 शहरांमधल्या लोकांनी सहभाग घेतला होता. मंदीतली अर्थव्यवस्था, डोक्यावरचा कर्जाचा बोजा यांचं काय होणार, आरोग्यावरचा खर्च वाढणार आहे, लोकांचा व्यवहार कसा बदलेल याची लोकांना आता चिंता लागलेली आहे. हे वाचा - घरी परतलेल्या प्रवासी मजुरांसांठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांची मोठी घोषणा या दोन महिन्यांच्या काळात मोठ्या शहरांमधून मजुरांचं प्रचंड मोठ्या प्रमाणावर स्थलांतर झालं आहे. त्यामुळे अनेक उद्योगांवर त्याचा विपरित परिणाम होणार आहे. आर्थिक स्थिती आणि शारिरीक आणि मानसिक आरोग्य या चिंतेने लोक सध्या भयग्रस्त झाले आहेत. हेही वाचा - या तीन कारणांमुळे कोरोनाबाधितांमध्ये मृत्यूचा सर्वाधिक धोका; अभ्यासातून खुलासा
कोरोनामुळे आपलेही झाले परके, 68 निराधार मृतदेहांवर योद्ध्याने केले अंत्यसंस्कार

)







