मराठी बातम्या /बातम्या /देश /

रेल्वेत अर्धनग्नावस्थेत आमदार महाशयाचं लाजिरवाणं कृत्य; प्रवाशांनी झापल्यानं त्यांनाही शिवीगाळ

रेल्वेत अर्धनग्नावस्थेत आमदार महाशयाचं लाजिरवाणं कृत्य; प्रवाशांनी झापल्यानं त्यांनाही शिवीगाळ

अर्धनग्नावस्थेत रेल्वेत फिरताना आमदार गोपाल मंडल... (फोटो- दै. भास्कर)

अर्धनग्नावस्थेत रेल्वेत फिरताना आमदार गोपाल मंडल... (फोटो- दै. भास्कर)

रेल्वे प्रवासादरम्यान एका आमदारानं केवळ अंडरविअर आणि बनियान घालून अर्धनग्न अवस्थेत लाजिरवाण कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 03 सप्टेंबर: रेल्वे प्रवासादरम्यान एका आमदारानं केवळ अंडरविअर आणि बनियान घालून अर्धनग्न अवस्थेत लाजिरवाण कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संबंधित रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी हटकल्यानंतर आमदारानं त्यांच्यासोबतही बाचाबाची केली आहे. या घटनेचा फोटो सोशल मीडियात व्हायरल (JDU MLA gopal mandal half naked viral photo) झाल्यानंतर अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. आरपीएफ टीमनं घटनास्थळी येऊन हे प्रकरण मिटवलं आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

दैनिक भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, गोपाल मंडलं (JDU MLA gopal mandal) असं लाजिरवाणं कृत्य करणाऱ्या आमदाराचं नावं असून ते नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या जनता दल युनायटेडचे ​​(जेडीयू) पक्षाचे नेते आहेत. ते गुरुवारी रात्री 02309 तेजस राजधानी एक्सप्रेसनं (Tejas Rajdhani Express) पाटणाहून नवी दिल्लीकडे जात होते. दरम्यान, ते ट्रेनमध्ये फक्त बनियान आणि अंतर्वस्त्रात फिरताना (Roam in inner wear only) आढळले आहेत. प्रवाशांनी तीव्र आक्षेप घेतल्यावर मंडल यांनी प्रवाशांनासोबतही हुज्जत घातली असून त्यांना शिवीगाळ केली आहे.

हेही वाचा-आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं;थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास

आमदारानं धावत्या ट्रेनमध्ये प्रवाशांसोबत खूप गोंधळ घातला आहे. यानंतर प्रवाशांनी केलेल्या तक्रारीवरून, ट्रेनमध्ये एस्कॉर्ट करणाऱ्या आरपीएफ टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी समजूत काढल्यानंतर आमदार महाशय आपल्या जागेवर जाऊन बसले आहेत. आमदार गोपाल मंडल आणि त्यांचे साथीदार सीट क्रमांक 13, 14 आणि 15 वर प्रवास करत होते. दरम्यान स्वच्छतागृहातून परत येत असताना, ते केवळ बनियान आणि अंतर्वस्त्रात होते. यावेळी त्याच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रल्हाद पासवान यांनी आमदाराच्या कृत्यावर आक्षेप घेतला.

हेही वाचा-एका अपघातातून बचावला पण दुसऱ्या अपघातात चिरडला; 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

पासवान आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होते. ते म्हणाले की, या डब्ब्यात महिलाही बसल्या आहेत, त्यामुळे तुम्ही काहीतरी मर्यादा ठेवायला हवी. प्रवाशानं सुनावल्यानंतर चूक मान्य करण्याऐवजी आमदारानं त्यांच्याशीच वाद घातला आहे. याप्रकरणी आरपीएफच्या एका अधिकाऱ्यानं सांगितले की, पासवान यांनी लेखी तक्रार केलेली नाही.

First published:

Tags: Crime news, Mla