जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / एका अपघातातून बचावला पण दुसऱ्या अपघातात चिरडला; बीडमध्ये 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

एका अपघातातून बचावला पण दुसऱ्या अपघातात चिरडला; बीडमध्ये 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

एका अपघातातून बचावला पण दुसऱ्या अपघातात चिरडला; बीडमध्ये 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

बीड जिल्ह्यातील वडवणी या ठिकाणी दुहेरी अपघाताची (Road Accident in Beed) एक विचित्र घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

बीड, 03 सप्टेंबर: बीड जिल्ह्यातील वडवणी या ठिकाणी दुहेरी अपघाताची (Road Accident in Beed) एक विचित्र घटना समोर आली आहे. एका अपघातातून बचावल्यानंतर दुसऱ्याच क्षणात झालेल्या दुसऱ्या अपघातात 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत (11 years old boy died in accident) झाला आहे. या दुर्घटनेत मृत मुलाचे वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघातात गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास वडवणीजवळील मोरवड फाट्यावर झाला आहे. नेमकं काय घडलं? गुरुवारी सायंकाळी सातच्या सुमारास वडवणी जवळील मोरवड फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली होती. या दुर्दैवी अपघातात एका दुचाकीवर पाठीमागे बसलेला 11 वर्षांचा मुलगा उडून रस्त्यावर फेकला गेला. दरम्यान पाठीमागून वेगात आलेल्या टिप्परनं त्याला चिरडलं आहे. हा अपघात इतका भयंकर होता की 11 वर्षीय चिमुकल्यानं जागीच प्राण सोडला आहे. हेही वाचा- घरात घुसून हातपाय बांधून तरुणीवर बलात्कार, पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना तसेच या अपघातात दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातानंतर आसपासच्या लोकांनी जखमींना त्वरित उपचारासाठी बीडला हलवण्यात आलं आहे. पण 11 वर्षीय बालकाचा दुचाकीच्या अपघातातून बचावल्यानंतर टिप्परनं चिरडलं आहे. अपघाताच्या विचित्र घटनेत चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्यानं कुटुंबीयांनी टाहो फोडला आहे. हेही वाचा- महिनाभरापासून बेपत्ता असणाऱ्या दीर-भावजयीचा हृदयद्रावक शेवट; धक्कादायक घटनेनं यवतमाळ हादरलं आयान शेख असं अपघातात मृत्यू झालेल्या 11 वर्षीय बालकाचं नाव आहे. तो आपले वडील शेख अख्तर यांच्यासोबत वडवणीहून उपळीकडे जात होता. दरम्यान वडवणीजवळील मोरवड फाट्यापासून जात असताना, माजलगाववरून बीडच्या दिशेनं जाणाऱ्या मन्मथ जुटे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली आहे. या दुर्घटनेत दुचाकीवर पाठीमागे बसलेला आयान रस्त्यावर फेकला गेला. दरम्यान पाठीमागून आलेल्या टिप्परनं त्याला चिरडलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात