मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं; थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास

आईवर विळ्यानं हल्ला होताना धाकट्याला नाही बघवलं; थरारक घटनेत थोरल्याचा खेळ खल्लास

Murder in Beed: थोरल्या भावाची हत्या करून त्यानं आत्महत्या (Murdered and plot as suicide) केल्याचा बनाव रचणाऱ्या भावाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे.

  • Published by:  News18 Desk

माजलगाव, 03 सप्टेंबर: थोरल्या भावाची हत्या करून त्यानं आत्महत्या (Murdered and plot as suicide) केल्याचा बनाव रचणाऱ्या भावाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक सत्य समोर आलं आहे. थोरला भाऊ आपल्या आईवर विळ्यानं हल्ला (Elder brother attack on mother with scythe) करत असल्याचं पाहून धाकट्या भावानं थोरल्या भावाची निर्घृण हत्या (younger brother killed elder brother) केली आहे. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून धाकट्या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. या हत्या प्रकरणात भावाला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास माजलगाव ग्रामीण पोलीस करत आहेत.

बापू ऊर्फ बाळासाहेब कदम असं हत्या झालेल्या थोरल्या भावाचं नाव आहे, तर गणेश कदम असं अटक केलेल्या धाकट्या भावाचं नावं आहे. दोघंही माजलगाव तालुक्यातील मालीपारगाव याठिकाणी आपल्या आई वडिलांसोबत राहतात. दरम्यान घरगुती कारणातून थोरला भाऊ आईवर विळ्यानं हल्ला करत होता. आईला होणारी मारहाण न बघवल्यानं धाकट्यानं थोरल्या भावाची पाठीमागून येऊन गळा आवळून हत्या केली आहे. यानंतर आरोपी भावानं मृत भावाचा मृतदेह घराच्या पाठीमागे ओसाड जागेत फेकून दिला होता.

हेही वाचा- एका अपघातातून बचावला पण दुसऱ्या अपघातात चिरडला; बीडमध्ये 11 वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत

मृत बापूनं आत्महत्या केल्याचा बनाव धाकटा भाऊ गणेशनं रचला होता. पण त्याचा हा बनाव फार काळ टिकला नाही. बापूच्या वडिलांनी खूनाच्या घटनेचा खुलासा केल्यानंतर आरोपी गणेशला अटक करण्यात आली आहे. लहान भावानं मोठ्या भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-बेपत्ता असणाऱ्या दीर-भावजयीचा हृदयद्रावक शेवट; धक्कादायक घटनेनं यवतमाळ हादरलं

वडिलांच्या फिर्यादीवरून माजलगाव ग्रामीण पोलिसांनी  बुधवारी रात्री उशीरा आरोपी भाऊ गणेश कदमला अटक केली आहे. दरम्यान आरोपीला गुरुवारी माजलगाव न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर मृत बापूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या आईवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा पुढील तपास माजलगाव पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Beed, Brother murder, Crime news