नागपूर, 11 ऑक्टोबर: माजी गृहमंत्री (Former Home Minister) अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. देशमुख यांच्या नागपुराच्या घरी सीबीआये (Cbi) पथक दाखल झाले आहे. सीबीआयचे पथक देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख यांचा अटक वॉरंट घेऊन आले असल्याचे नागपुरातील (Nagpur) काही सूत्र सांगत आहेत. मात्र घराबाहेर सध्या कुठलीही हालचाल नसल्याची माहितीही समोर येत आहे.
नेहमी प्रमाणे दार बंद असून बाहेर नागपूर पोलिसांचा नेहमी असणारा पोलीस बंदोबस्त तैनात आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा- Maharashtra Bandh: बेस्ट बस तोडफोडीचा Live Video आला समोर
सीबीआयचे एकूण 5 ते 6 अधिकारी देशमुख यांच्या घरी पोहोचलं आहे. आज सकाळी 7 वाजता सीबीआयचं पथक देशमुखांच्या घरी दाखल झालं. मात्र गेल्या दोन महिन्यांपासून अनिल देशमुख ते कुठे आहेत याची कोणालाही माहिती नाही आहे.
Income Tax ची धाड
गेल्या महिन्यात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुख (Maharashtra Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड (Income Tax raid) टाकली होती. नागपुरातील मिडास बिल्डिंगमधील (Midas building Nagpur) साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाची झाडाझडती केली. या कारवाई दरम्यान इन्कम टॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत CRPF चे पथक सुद्धा उपस्थित होतं.
हेही वाचा- सोलापुरात युवासेना आक्रमक; रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात, Live Video
कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त
दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची कोट्यवधी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली होती. तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. ईडीने केलेली ही कारवाई म्हणजे अनिल देशमुख यांना हा एक मोठा झटका आहे. ईडीने अनिल देशमुख यांची स्थावर मालमत्ता जप्त केली. आहे. जप्त केलेल्या या स्थावर मालमत्तेची किंमत 4.20 कोटी रुपये इतकी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Anil deshmukh, CBI