• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • Maharashtra Bandh: ठाण्यात शिवसेनेची दादागिरी, रिक्षा बंद करण्यासाठी जबरदस्ती; Live Video

Maharashtra Bandh: ठाण्यात शिवसेनेची दादागिरी, रिक्षा बंद करण्यासाठी जबरदस्ती; Live Video

Band in maharashtra: काही रिक्षावाल्यांना मारहाण देखील केली आहे. या घटनेचा व्हिडिओ (video) आतासमोर आला आहे.

 • Share this:
  ठाणे, 11 ऑक्टोबर: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी (lakhimpur kheri case) येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची (Maharashtra Bandh) हाक दिली आहे. राज्यभरात महाराष्ट्र बंदला प्रतिसाद मिळत आहे. मात्र ठाण्यात शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते रिक्षावाल्यांवर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जबरदस्तीनं रिक्षा बंद करण्यास सांगितले. धक्कादायक म्हणजे यावेळी त्यांनी काही रिक्षावाल्यांना मारहाण देखील केली आहे. या घटनेचा व्हिडिओ (video) आतासमोर आला आहे. बंद यशस्वी करण्यासाठी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते ठाण्यातल्या रस्त्यावर उतरले. यावेळी त्यांनी रिक्षावाल्यांना रिक्षा बंद करण्यासाठी सांगत मारहाण केली आहे. ही मारहाण कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ही घटना ठाणे रेल्वे रिक्षा स्टॅड जवळची आहे. बीडमध्ये शिवसेनेची गांधीगिरी महाविकास आघाडीने पुकारलेल्या बंदला यशस्वी करण्यासाठी बीड (Beed) शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं सकाळीच रस्त्यावर उतरली आहे. शिवसेनेकडून व्यापाऱ्यांना गुलाबाचं फुल देऊन आपली आपली दुकान बंद करण्याच आवाहन करीत आहेत. यात शिवसेनेचे नेते परमेश्वर सातपुते, उप-जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, हनुमान जगताप, बाप्पासाहेब घुगे हे नेते रस्त्यावर उतरून महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी गांधीगिरी मार्गानी रस्त्यावर आहेत. हेही वाचा- सोलापुरात युवासेना आक्रमक; रस्त्यावर टायर जाळून बंदची सुरुवात, Live Video शिवसेनेकडून सकाळी 6 वाजेपासून रस्त्यावर उतरून दुकानदारांना आवाहन करत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. यावेळी केंद्र सरकार विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत मोदी सरकारचा निषेध व्यक्त केला. बीड जिल्ह्यातील सर्व तालुक्यात बंदची हाक दिली आहे. बंद शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने देखील चोख व्यवस्था केलेली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: