मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'JNUमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला 26/11ची आठवण करून देणारा', उद्धव ठाकरे आक्रमक

'JNUमध्ये विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला 26/11ची आठवण करून देणारा', उद्धव ठाकरे आक्रमक

'महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही', असं म्हणत JNU मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही', असं म्हणत JNU मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

'महाराष्ट्रात हे खपवून घेतलं जाणार नाही', असं म्हणत JNU मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

नवी दिल्ली, 6 जानेवारी : 'दिल्लीत जेएनयूमध्ये झालेला हल्ला हा मुंबईत झालेल्या 26/11 च्या हल्ल्याची आठवण करून देणारा आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. मी महाराष्ट्रात असा प्रकार खपवून घेणार नाही,' अशी आक्रमक भूमिका मुखमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. तसंच उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची चौकशी होऊन हल्लेखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU)इथं कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांवर झालेला हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP)केल्याचा डाव्या संघटनांचा आरोप आहे. जेएनयूमधील या हल्ल्याचा महाराष्ट्रातूनही मोठा निषेध केला जात आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

बुरख्याआडचा चेहरा कुणाचा ?

- सरकार कुणाचेही असाे, असले हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत

- देशाच्या संस्कृतीला अनुसरून युवकांना विश्वासात घ्यायला हवं

- युवक हॉस्टेलमध्ये सुरक्षित नसतील तर धाेक्याचे आहे

- महाराष्ट्रात हे घडू देणार नाही, आपल्या केसालाही धक्का लावणाऱ्यांवर कारवाई करू

- युवकांमध्ये जी अस्थिरता निर्माण झालीय ती दूर करणे गरजेचं

- बुरखाधारी हे डरपाेक, बुरखा का बांधता ? हिंमत नाही का ?

- हे भित्रे आहेत, या भ्याडपणाचं समर्थन कधीच हाेणार नाही

- राज्यात चिंता करायची गरज नाही

- बुरख्यामागचा चेहरा उघड व्हायला हवा

- पाेलीस जर कारवाई करणार नसतील, तर त्यांच्यावर शंका उपस्थित हाेतील

- युवाशक्ती म्हणजे युवाबॉम्ब आहेत, त्याला जागवू नका

शरद पवारांनीही केला निषेध

'जेएनयूचे विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर भ्याड आणि नियोजित हल्ला करण्यात आला आहे. तोडफोड आणि हिंसाचाराच्या या कृत्याचा मी तीव्रपणे निषेध करतो. हिंसेचा वापर करून लोकशाही मूल्ये आणि विचार दाबण्याचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही,' असं ट्वीट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

दुसरीकडे, अभिनेता रितेश देशमुख यानेही या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. 'आपल्याला आपला चेहरा झाकण्याची गरज का आहे? कारण आपल्याला माहीत आहे की आपण काहीतरी चुकीचे, बेकायदेशीर करत आहोत. जेएनयूमध्ये विद्यार्थ्यी आणि शिक्षकांवर मुखवटा घातलेल्या गुंडांनी क्रूरपणे हल्ला केल्याची दृश्य भयंकर आहेत. अशा प्रकारची हिंसाचार सहन केली जाऊ शकत नाही,' असं म्हणत रितेश देशमुख याने आपला संताप व्यक्त केला आहे.

JNUमध्ये नेमकं काय घडलं?

जेएनयूमध्ये घुसून विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी (ABVP) मुखवटा घातलेल्या लोकांनी हल्ला केल्याचा आरोप डाव्या विचारसरणीचे समर्थन करणारे विद्यार्थी करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांना काही मुखवटा घातलेल्या लोकांनी रॉडने मारहाण केली. JNUच्या विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याबाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांनी सांगितले.

First published:
top videos