मक्का-मदिनेतल्या मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातल्या का नाही? - जावेद अख्तर

मक्का-मदिनेतल्या मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातल्या का नाही? - जावेद अख्तर

आतापर्यंत 300 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सर्वच राज्यांना सावधगिरीचा इशारा देण्या आला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 31 मार्च : सर्व जगभर करोनाचं (Coronavirus Pandemic)  थैमान सुरूच आहे. भारतातले कोरोनाग्रस्तांचे (Corona) आकडे वाढतच आहेत. अशातच दिल्लीतल्या मरकज प्रकरणामुळे सगळ्यांची झोप उडाली. सरकारसह सर्वच संस्था 'सोशल डिस्‍टेंसिंग'चं आवाहन करत असतानाच दिल्लीतलं प्रकरण पुढे आलं आहे. तब्लीग-ए-जमात कार्यक्रमात तब्बल 2 हजार लोक सहभागी झाले होते. त्यात विदेशातून आलेल्या मैलवींचाही समावेश होता. त्यामुळे त्यातल्या 300 पेक्षा जास्त जणांना कोरोना झाल्याचा संशय आहे. अशी परिस्थिती असताना दारुल उलूम देवबंदने मिशिदी बंद ठेवण्यासाठी फतवा काढावा अशी मागणी अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद (Tahir Mahmood) यांनी केली आहे. त्यावर आता ज्येष्ठ लेखक आणि गीतकार जावेद अख्तर  (Javed Akhtar) यांनीही आपलं मत व्यक्त केलं.

जावेद अख्तर म्हणाले, ताहिर महमूद हे विद्वान आहेत. त्यांच्या मागणीला माझं पूर्ण समर्थन आहे. काबा, मक्का आणि मदिनेतल्या मशिदी जर बंद राहू शकतात तर भारतातल्या का नाही? असा सवाल त्यांनी केला आहे.

देशभरात सध्या दिल्लीच्या निजामुद्दीन येथील तब्लिगी जमात परिषदेमुळे भीतीचे वातावरण आहे. 13 ते 15 मार्च दरम्यान फक्त देशातील विविध राज्यांमधूनच नव्हे तर परदेशातूनही लोकं हजर होते. भारत आणि परदेशातील लोकांसह एकूण 1830 लोक या परिषदेसाठी उपस्थित होते. 15 मार्चनंतर तब्बल 1400 लोकं दिल्लीमध्ये होते.

आतापर्यंत 300 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर कर्नाटक, जम्मु काश्मीर आणि मुंबईत प्रत्येकी एक अशा 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्ली रुग्णालायत असणाऱ्या 35 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

वाचा - पंतप्रधान करत आहेत ‘योगनिद्रे’चा अभ्यास, लॉकडाऊमध्ये तुम्ही करू शकता ‘या' गोष्टी

एकीकडे या परिषदेमुळे देशभरात कोरोना पसरत असताना दुसरीकडे, अंदमानमधील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या 10 पैकी 9 लोकं तब्लिगी जमात परिषदेत सहभागी झाले होते. या परिषदेत सामिल झालेले 1830 लोकं राज्याच्या विविध भागातून आले होते.

उत्तर प्रदेश राज्याच्या सीमा सील

या परिषदेसाठी उत्तर प्रदेशातील 157 लोक सामिल झाल्याची माहिती आहे. ही सर्व लोकं दिल्लीत असून तेथील रुग्णालयात त्यांना अलग ठेवण्यात आले आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे. उत्तर प्रदेश राज्याची संपूर्ण सीमा सील केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही राज्यातील जनतेने जिथे आहेत तिथेच राहिले पाहिजे असे म्हटले आहे.

वाचा - विद्यार्थ्याच्या कर्तृत्वाला सलाम, साठवलेले 11 हजार दिले पंतप्रधान मदत निधीला

या क्षणी कोणालाही सीमा ओलांडण्याची परवानगी दिली जाणार नाही. लखनऊ, गाझियाबाद, मेरठ, सहारनपूर, मुजफ्फरनगर, शामली, हापूर, बिजनौर, बागपत, वाराणसी, भदोही, मथुरा, आग्रा, सीतापूर, बाराबंकी, प्रयागराज, बहराईच, गोंडा आणि बलरामपूर येथील लोक जमातमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळाली.

वाचा-'10 सेकंद श्वास रोखलात तर तुम्हाला कोरोना नाही', व्हायरसच्या सेल्फ टेस्टबाबत Fact Check

तब्लिगी जमात परिषदेचे वकील फुजाईल अय्युबी यांनी, परिषदेदरम्यान कर्फ्यू पाससाठी पत्र लिहिले गेले होते. 17 वाहनांसाठी पासची मागणी केली गेली, जेणेकरून दूर राहणाऱ्या लोकांना त्यांच्या घरी पाठवता येईल, असे सांगितले.

22 मार्च रोजी सार्वजनिक कर्फ्यू आणि नंतर लॉकडाऊनमुळे लोकांना घरी पाठवणे कठीण झाले होते. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणाने दिल्ली पोलीस आणि प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिषेदेच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात, 24 मार्चपासून आम्ही सतत पोलिस आणि प्रशासनाच्या संपर्कात होते, असे सांगण्यात आले आहे.

First published: March 31, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading