जयपूर, 31 मार्च : भारत सध्या कोरोनाव्हायरस (Coronavirus)मुळे मृत्यूशी झुंज देत आहे. दररोज संक्रमित होण्याचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत 1251 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. या साथीवर लढा देण्यासाठी लोक पंतप्रधान मदतनिधीला आर्थिक मदतही देत आहेत. लहान मुलेही यात मागे नाहीत. राजस्थानमध्ये बन्सवारा इथे पाचव्या वर्गात शिकणार्या मुलाने वाढदिवसाच्या दिवशी मदत निधीसाठी पॉकेट मनीमधून एकूण 11 हजार रुपये दान केले आहेत. त्याच्या या निर्णयमामुळे सगळ्यांनीच सोशल मीडियावर त्याची खूप प्रशंसा केली आहे. हे वाचा - कोरोना हरला आणि प्रेम जिंकलं, आजारी पतीला 55 दिवसांत लिहली 45 लव्ह लेटर्स काय आहे संपूर्ण प्रकरण? कंधार वाडी भागात राहणारे अंशुलचे वडील कल्पेश पवार हे टेलर आहे. कुटुंब चालवण्याव्यतिरिक्त ते अर्धावेळ विमा एजंट म्हणून काम करतात. सोमवारी अंशुलचा 11 वा वाढदिवस होता. तो बर्याच दिवसांपासून आपले पॉकेटमनी बँकेत जमा करीत होता. वाढदिवशी त्याने पिगी बँक फोडून पैसे मोजले. एकूण 11 हजार रुपये होते. अंशुलने हे पैसे मदत निधीमध्ये टाकण्याचे ठरविले. त्याने आपली इच्छा आजोबा आणि वडिलांकडे व्यक्त केली. दोघांनी तातडीने यासाठी परवानगी दिली. मात्र, राज्यात लॉकडाऊन असल्याने जिल्हाधिकारी कार्यालय गाठणे सोपे नव्हते. अशा स्थितीत शेजारी विवेक वीर वैष्णव मुलासह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. यावेळी जिल्हाधिकारी कैलास बेरवा कोरोनासंदर्भात अधिकाऱ्यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेत होते. हे वाचा - दिल्लीतील एका चुकीमुळे देशभरात खळबळ, मुंबईपासून-अंदमानपर्यंत पसरला कोरोना दोघेही बाहेर थांबले. सभा संपल्यानंतर जिल्हाधिकारी बाहेर आले तेव्हा अंशुलने कबूल केले की, आपली रक्कम मदत निधीमध्ये दान करायची आहे. असे बोलून त्याने त्यांना पॉकेटमनी पैकी 11 हजार रुपये दिले. अंशुल यांच्या कार्याचे जिल्हाधिकारी व तेथे उपस्थित इतर अधिकाऱ्यांनी कौतुक केले. अंशुलने सांगितले की आजोबा हरीलाल आणि वडील कल्पेश यांच्यासह आई कामिनी यांच्याकडूनही त्यांना बरीच प्रेरणा मिळाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.