पंतप्रधान करत आहेत ‘योगनिद्रे’चा अभ्यास, लॉकडाऊमध्ये तुम्ही सुद्धा करू शकता ‘या’ सोप्या गोष्टी

पंतप्रधान करत आहेत ‘योगनिद्रे’चा अभ्यास, लॉकडाऊमध्ये तुम्ही सुद्धा करू शकता ‘या’ सोप्या गोष्टी

लॉकडाऊमध्ये घरी बसून अनेकांना खूप कंटाळा आला आहे, अनेकांची चिडचिड होत आहे. मात्र घरी राहणे अनिवार्य आहे. अशावेळी कोणत्या गोष्टी तुम्ही करू शकता, वाचा इथे.

  • Share this:

मुंबई, 31 मार्च : आज लॉकडाऊनचा सातवा दिवस आहे. अनेकांना वर्क फ्रॉम करावं लागत आहे, तर काही जणांना त्यांच्या ऑफिसमधून सुट्टी देण्यात आली आहे. अशावेळी ज्यांना फिरायची हौस आहे, मित्रमंडळींमध्ये ज्यांची कायम उठबस असते अशांना घरात कोंडून राहणं पटत नाही आहे. मात्र जर जीव वाचावायचा असेल तर घरात राहणं अनिवार्य आहे. अशावेळी अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती देत आहेत, की तुम्ही लॉकडाऊनमध्ये काय काय करू शकता.

व्यायाम आणि वर्कआऊट

लॉकडाऊनमुळे सर्वत्र जिम बंद आहेत. त्यामुळे घरच्याघरी कसा व्यायाम करायचा असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर तुम्ही घरातच काही व्यायाम किंवा वर्कआउट करू शकता. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून या छोट्या वर्कआऊट संदर्भात व्हिडीओ पोस्ट केले आहेत.

 

View this post on Instagram

 

Being home 💫🏡💜 #TerraceWorkouts #StaySafeStayHome #MondayMotivation

A post shared by Shraddha (@shraddhakapoor) on

योगाभ्यास

या दरम्यान योगाभ्यास करणं सगळ्यात उत्तम पर्याय आहे. काहींना घरामध्ये बसून कंटाळा येतो, चिडचिड होते. अशावेळी योग खूप मदतीचा ठरेल. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत ट्वीट केले आहे. आठवड्यातून 2-3 वेळा ‘योग निद्रा’चा अभ्यास करत असल्याचे ते म्हणाले. यामुळे शरीर स्वास्थ्य आणि मन प्रसन्न राहण्यास मदत होत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

पुस्तक वाचन

अनेकांची तक्रार असते की रोजच्या धकाधकीच्या जीवनाच पुस्तक वाचायला मिळत नाही. आता तुमच्याकडे इतका वेळ आहे, तुम्ही अनेक सुंदर पुस्तकं वाचू शकता. तुम्ही वाचनालयात जाऊ शकत नाही, पण आता अनेक पुस्तकं ऑनलाईन उपलब्ध आहेत. पुस्तक वाचल्यानंतर एकप्रकारे ताजेतवाने झाल्यासारखेच वाटेल.

बैठे खेळ आणि गप्पा

एरवी दोन क्षण घरच्यांशी गप्पा मारणं कठीण होऊन जातं, खेळ तर खूप दूरची गोष्ट आहे. मात्र आता वर्क फ्रॉम होम जरी असलं, तरी ऑफिसला जाण्या-येण्याचा वेळ वाचतोच आहे. यावेळात तुम्ही घरबसल्या काही खेळ खेळू शकता आणि कुटुंबीयांशी गप्पा देखील मारू शकता. खेळ खेळताना लहानपणींच्या आठवणींनी उजाळाही मिळेल आणि घरातच राहिल्यामुळे  निर्माण झालेले कोंदट वातावरणही क्षणार्धाच लुप्त होईल.

मोबाइल हा सर्वात मोठा विरंगुळा

सध्या अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत की, जर लॉकडाऊनच्या काळात मोबाईल नसता तर काय केलं असतं? खरंच हा प्रश्न पडला की गंभीर व्हायला होतं. मग जो मोबाइल आपलं जीवन आहे त्याचा वापर करून आपण अनेक गोष्टी करू शकतो. पुस्तक वाचन, ब्रेन गेम्स, ऑनलाइन कोर्स इत्यादी गोष्टींमध्ये तुमचा वेळ गुंतवलात तर लॉकडाऊनचे 21 दिवस पटकन जातील.

First published: March 31, 2020, 2:34 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading