चंदीगड, 19 मार्च: पंजाब निवडणुकीत (Punjab elections) मोठ्या विजयानंतर, आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party, AAP) च्या भगवंत मान (Bhagwant Mann) यांनी मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister) शपथ घेतली. मान यांनी 16 मार्च रोजी शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे मूळ गाव खटकरकलन येथे शपथ घेतली. भगवंत मान यांनी आता मंत्रिमंडळ स्थापन केलं आहे. भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळाची स्थापना 19 मार्च रोजी राजभवनात झाली. राज्यपालांनी 10 आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली. खुद्द भगवंत मान यांनी होळीच्या संध्याकाळी ट्विट करून आपल्या मंत्र्यांच्या नावांची घोषणा केली होती. पहिल्यांदाच मुख्यमंत्री झालेल्या भगवंत मान यांनी नव्या मंत्रिमंडळात प्रत्येक विभाग आणि क्षेत्राला सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. दलित, महिला आणि हिंदू समाजातील आमदारांनाही त्यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. मंत्रिमंडळ स्थापनेतही माढा आणि माळवा विभागाचे वर्चस्व दिसून येत आहे. हरपाल सिंह चीमा दिडबा विधानसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा आमदार झालेले हरपाल सिंग चीमा हे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राहिले आहेत. चीमा हे व्यवसायाने वकील आहेत आणि आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासून ते संबंधित आहेत. त्यांना आम आदमी पक्षाचा मोठा दलित चेहरा मानला जातो.
Chandigarh | AAP leaders Harpal Singh Cheema, Dr Baljit Kaur, Harbhajan Singh ETO, Dr Vijay Singla take oath as ministers in the Punjab cabinet. pic.twitter.com/pqDiUZwKP2
— ANI (@ANI) March 19, 2022
डॉ. बलजीत कौर डॉ बलजीत कौर या आम आदमी पक्षाचे माजी खासदार साधू सिंह यांच्या कन्या आहेत. डॉ. बलजीत कौर या मलोत विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. डॉ. बलजीत कौर या व्यवसायाने नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. हरभजन सिंह ईटीओ भगवंत मान यांनी आपल्या मंत्रिमंडळात हरभजन सिंह ईटीओचाही समावेश केला आहे. हरभजन सिंह ईटीओ जंदियाला विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत. हरभजन सिंह 2012 मध्ये ईटीओ झाले होते आणि 2017 मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर आम आदमी पक्षात सामील झाले. डॉ विजय सिंगला मानसातून आमदार निवडून आलेले डॉ. विजय सिंगला यांनी प्रसिद्ध पंजाबी गायक आणि काँग्रेसचे उमेदवार सिद्धू मूसवाला यांचा पराभव केला. ते व्यवसायाने डेंटल सर्जन आहेत.
Chandigarh | AAP leaders Harpal Singh Cheema, Dr Baljit Kaur, Harbhajan Singh ETO, Dr Vijay Singla take oath as ministers in the Punjab cabinet. pic.twitter.com/pqDiUZwKP2
— ANI (@ANI) March 19, 2022
लालचंद कटारुचक्क लालचंद कटारुचक यांनी भोआ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे. ते प्रदीर्घ काळ समाजसेवेत सक्रिय असून पहिल्यांदाच निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले आहेत. लालचंद कटारुचक यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जोगिंदर पाल यांचा पराभव केला. गुरमीत सिंह मीत हेयर गुरमीत सिंह मीत हेयर हे सलग दुसऱ्यांदा बरनाळामधून आमदार झाले आहेत. बी.टेक.चे शिक्षण घेतल्यानंतर ते नागरी सेवांच्या तयारीसाठी दिल्लीला गेले. गुरमीत अण्णा हजारे यांच्या दिल्लीतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाशी निगडीत होते आणि नंतर आम आदमी पक्षात सामील झाले. 32 वर्षीय मीत हेयर दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत. हरजोत सिंह बैंस हरजोत सिंह बैंस हे श्रीआनंदपूर साहिब विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. हरजोत सिंह बैंस यांनी मागील सरकारच्या काळात पंजाब विधानसभेचे अध्यक्ष राणा केपी सिंग यांचा पराभव केला होता. लंडनमध्ये शिकलेले हरजोत सिंह हे वकील आहेत. गेल्या वेळी त्यांनी साहनेवालमधून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांचा पराभव झाला होता. हरजोत हे आम आदमी पार्टीच्या युवा शाखेचे अध्यक्षही आहेत.
Chandigarh | AAP leaders Lal Chand Kataruchak, Gurmeet Singh Meet Hayer, Kuldeep Singh Dhaliwal, Laljit Singh Bhullar take oath as ministers in the Punjab cabinet. pic.twitter.com/RNzhw0PpYO
— ANI (@ANI) March 19, 2022
लालजीत भुल्लर लालजीत भुल्लर यांनी पट्टी या विधानसभा जागेतून आदेश प्रताप सिंह कैरॉन यांचा पराभव केला. कैरॉन हे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे जावई आहेत. पट्टीच्या धान्य मार्केटमध्ये काम करणारे लालजीत सिंह भुल्लर कधीकाळी कैरॉन यांच्या जवळ असायचा. ब्रह्मशंकर जिम्पा होशियारपूर मतदारसंघातून ब्रह्माशंकर जिम्पा विजयी झाले. त्यांनी चन्नी सरकारमधील मंत्री सुंदर अरोरा यांचा पराभव केला. ब्रह्मशंकर त्यांचा व्यवसाय करतात. विद्यार्थीदशेपासूनच ते राजकारणात सक्रिय राहिले. ब्रह्माशंकर हे 25 वर्षे नगरसेवक ही राहिले आहेत. कुलदीप सिंह धालीवाल अजनाळा मतदारसंघातून आमदार झालेले कुलदीप सिंह धालीवाल सात वर्षांपूर्वी आम आदमी पक्षाशी संबंधित होते. ते बागकाम करतात. कुलदीपसिंह धालीवाल यांच्यावरही खुनाचा गुन्हा दाखल आहे. धालीवाल त्यांच्या गावात हाशिम शाहचा मेळा आयोजित करत आले आहेत, ज्यात पंजाबमधील कलाकार सहभागी होत असतात.