• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केली माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची हत्या; मुलीची प्रकृती गंभीर

पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केली माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची हत्या; मुलीची प्रकृती गंभीर

दहशतवादी माजी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात या माजी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला (SPO and His Wife Killed by Terrorists in Pulwama).

 • Share this:
  श्रीनगर 28 जून : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे दहशतवाद्यांनी एका माजी विशेष पोलिस अधिकाऱ्याच्या (SPO) घरात घुसून त्यांची हत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी पुलवामा येथील हरिपरीग्राम गावात स्थित माजी एसपीओ फैयाज अहमद यांच्या घरी पोहोचले आणि तिथे त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. या हल्ल्यात या माजी अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला तर उपचारादरम्यान त्यांच्या पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला (SPO and His Wife Killed by Terrorists in Pulwama). यासोबतच एसओपींची मुलगी गंभीर जखमी असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसराला घेराव घालून शोध मोहीम सुरू केली आहे. जम्मूच्या (Jammu) सतवारी (Satvari) परिसरात एअऱफोर्स बेसवर (Air force base) झालेल्या शक्तीशाली स्फोटांच्या घटनेनंतर आता ही घटना उघडकीस आली आहे. ड्रोन हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचा हात असल्याचं म्हटलं जात आहे. पहिला स्फोट पहाटे 1.40 च्या सुमारास झाला, ज्यामुळे विमानतळाच्या तांत्रिक भागामधील इमारतीचं छत कोसळलं. वायुसेनेने या जागेच्या देखभालीची जबाबदारी घेतली आहे आणि सहा मिनिटानंतर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. या स्फोटात हवाई दलाचे दोन जवान जखमी झाले. जम्मूतील एअरफोर्स बेसवरील हल्ल्यामागे जैश किंवा लष्कर-ए-तोयबाचा हात? दहशतवादी हल्ल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी नाकारली नाही. जम्मू विमानतळ आणि आंतरराष्ट्रीय सीमा यादरम्यानचं हवाई अंतर 14 किलोमीटर आहे. तपासात सामील असलेले अधिकारी दोन्ही ड्रोनच्या हवाई मार्गाचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. राजस्थानमधील एका गावानं असा रोखला कोरोना, राज्यभरात ‘टीम सरपंच’ची चर्चा शक्तीशाली स्फोटांमागे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) किंवा लष्करी-ए-तोयबा (Lashkar-e-Taiyaba) या संघटनांचा हात असण्याची शक्यता जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह (DGP Dilbag Singh) यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर राज्यभर हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला असून सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा (Security) वाढवण्यात आली आहे. डीजीपी म्हणाले, की जम्मू पोलिसांनी 5-6 किलो वजनाचा आयईडी जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताची सध्या चौकशी केली जात आहे. आणखी काही संशयितांना लवकरच अटक करण्यात येऊ शकते.
  Published by:Kiran Pharate
  First published: