मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

राजस्थानमधील एका गावानं असा रोखला कोरोना, राज्यभरात ‘टीम सरपंच’ची चर्चा

राजस्थानमधील एका गावानं असा रोखला कोरोना, राज्यभरात ‘टीम सरपंच’ची चर्चा

राजस्थानमधील एका गावात सरपंच आणि त्यांच्या 100 जणांच्या टीमनं एक अनोखा प्रयोग राबवत कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळवलं आहे. या उपक्रमाचं सध्या राज्यभर कौतुक होतंय.

राजस्थानमधील एका गावात सरपंच आणि त्यांच्या 100 जणांच्या टीमनं एक अनोखा प्रयोग राबवत कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळवलं आहे. या उपक्रमाचं सध्या राज्यभर कौतुक होतंय.

राजस्थानमधील एका गावात सरपंच आणि त्यांच्या 100 जणांच्या टीमनं एक अनोखा प्रयोग राबवत कोरोनाला वेशीबाहेर ठेवण्यात यश मिळवलं आहे. या उपक्रमाचं सध्या राज्यभर कौतुक होतंय.

  • Published by:  desk news

जयपूर, 27 जून: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second wave) धुमाकूळ घातला असताना राजस्थानमधील (Rajasthan) एका गावानं मात्र कोरोनाला (Corona) हद्दीच्या बाहेर रोखण्यात यश मिळवलंय. राजस्थानच्या (Rajasthan) भिलवाडा (Bhilwada) जिल्ह्यातील कलियावास (Kaliyawas) ग्रामपंचायतीनं योग्य नियोजनाच्या आणि शिस्तबद्ध कारभाराच्या जोरावर ही कमाल करून दाखवली आहे. या गावचे सरपंच शक्ती सिंग (Shakti Singh) त्यांची 100 कार्यकर्त्यांच्या (100 volunteers) टीमनं ही कमाल करून दाखवली आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेचा अधिकाधिक प्रभाव हा शहरी भागात जाणवला. मात्र दुसऱ्या लाटेनं ग्रामीण भागात अधिक धुमाकूळ घातल्याचं चित्र दिसत होतं. अनेक छोट्या मोठ्या गावात कोरोनाची ही लाट पसरली आणि ग्रामीण भागातून मोठ्या संख्यने रुग्ण दाखल होत असल्याचं चित्र एप्रिल आणि मे महिन्यात दिसत होतं. मात्र राजस्थानमधील कलियावास गावातील सरपंच शक्ती सिंग यांनी गावातील 100 कार्यकर्त्यांना एकत्रित केलं आणि कोरोनाशी चार हात करण्याचा फैसला केला.

कोरोनावर अशी केली मात

सरपंच शक्ती सिंग यांचा फोटो छापलेले पांढऱ्या रंगाचे शर्ट घालून ही 100 जणांची टीम त्यांना नेमून दिलेल्या कामाला सुरुवात करत असे. हा शर्ट म्हणजे एक प्रकारे सदस्यांचं ओळखपत्रच होतं. सरकारनं जेव्हा विकेंड कर्फ्युची घोषणा केली,तेव्हा त्यांनी गावात येणाऱ्या, गावाबाहेर जाणाऱ्या आणि गावातल्या गावात फिरणाऱ्या ग्रामस्थांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष केंद्रीत केलं. गावात कुणीही अनावश्यक फिरणार नाही आणि एका ठिकाणी गर्दी होणार नाही, यासाठी गावाच्या वेगवेगळ्या भागात हे स्वयंसेवक हजर असत. त्याचप्रमाणं मास्क आणि सॅनिटायझर घेऊन एकेक सदस्य दररोज घरोघरी भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील ग्रामस्थांच्या तब्येतीची विचारपूस करत असे. अनेकदा ताप आल्याचं किंवा त्रास होत असल्याचं लोक लपवून ठेवतं. पण प्रत्यक्ष भेट घेतल्यामुळे ही लक्षणे टीम सदस्यांच्या नजरेस पडायची आणि लगेचच त्या सदस्याची तपासणी करून उपचार सुरु केले जायचे.

हे वाचा - ''तुम्हीही घाबरू नका, माझ्या आईनं कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले''

सर्व स्तरातील ग्रामस्थांचा सहभाग

या टीममध्ये व्यापारी, शेतकरी, शिक्षक आणि काही सरकारी कर्मचाऱ्यांचाही सहभाग होता. त्यांच्या प्रयत्नामुळे कोरोना काळात गावात कोरोनाच्या केवळ चारच केसेस आढळल्या. पहिल्या लाटेत गावातील 54 जणांना कोरोनाची बाधा झाली होती. दुसरी लाट अधिक भीषण असूनही या अनोख्या प्रयोगामुळे कोरोनाला वेशीबाहेर रोखण्यात त्यांना यश मिळालं.

First published:

Tags: Coronavirus, Rajasthan