• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • जम्मूतील एअरफोर्स बेसवरील हल्ल्यामागे जैश किंवा लष्कर-ए-तोयबाचा हात, जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट

जम्मूतील एअरफोर्स बेसवरील हल्ल्यामागे जैश किंवा लष्कर-ए-तोयबाचा हात, जम्मू काश्मीरमध्ये हाय अलर्ट

जम्मूमधील एअरफोर्स बेसवर झालेल्या हल्ल्यामागे पाकिस्तानातील दहशतवादी संघटना असू शकतात, असा अंदाज जम्मू काश्मीरच्या पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला आहे. छुप्या पद्धतीनं ड्रोनची तस्करी झाल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जून: जम्मूच्या (Jammu) सतवारी (Satvari) परिसरात एअऱफोर्स बेसवर (Air force base) झालेल्या शक्तीशाली स्फोटांमागे जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammad) किंवा लष्करी-ए-तोयबा (Lashkar-e-Taiyaba) या संघटनांचा हात असण्याची शक्यता जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह (DGP Dilbag Singh) यांनी व्यक्त केली आहे. या घटनेनंतर राज्यभर हाय अलर्ट (High Alert) जारी करण्यात आला असून सर्व महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा (Security) वाढवण्यात आली आहे. ड्रोनच्या वापराने हल्ले झाल्याने चिंता ज्या भागात हे स्फोट घडवण्यात आले, त्याच भागात अनेक महत्त्वाची कार्यालयं आहेत. जम्मूचं मुख्य विमानतळदेखील याच भागात असून स्फोटानंतर परिसरात अस्थिरतेचं वातावरण आहे. एअरफोर्सच्या बेसवर झालेले हल्ले हे ड्रोनच्या माध्यमातून करण्यात आल्यामुळे यामागे जैश-ए-मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबाचा हात असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर पठाणकोट, अंबाला आणि अवंतीपूरसह अन्य हवाई तळांची सुरक्षा वाढवण्यात आली असून सर्व यंत्रणांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. या हल्ल्यासाठी वापरलेली यंत्रणा पाहता हा केवळ स्थानिक बंडखोरांनी केलेला हल्ला नसून त्यामागे मोठ्या दहशतवादी संघटनेचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ड्रोनचा वापर कसा झाला? काही महिन्यांपूर्वी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेनं हिज्बुल मुजाहिदीनच्या मदतीनं पाकिस्तानमधून भारतात छुप्या पद्धतीनं काही ड्रोन आणल्याची कुणकुण सुरक्षा यंत्रणांना लागली होती. त्यावेळी 5 ते 6 किलो वजनाचा एक आयईडीदेखील पोलिसांनी जप्त केला होता. याच दरम्यान, ड्रोन बनवण्याचं सुट्टं साहित्य छुप्या मार्गाने जम्मू काश्मीर परिसरात आणून त्याचा वापर हा हल्ल्यासाठी केला असावा, असा संशय जम्मू काश्मीर पोलिसांना आहे. पोलीस सध्या त्या दिशेने तपास करत आहेत. हे वाचा - राहुल गांधी अफवा पसरवतात, शिवराज सिंग चौहानांचा पलटवार मोठ्या हल्ल्यांसाठी सज्ज मोठ्या हल्ल्यांपूर्वीचा हा एक हल्ला असू शकतो, असाही संशय जम्मू काश्मीर पोलीस व्यक्त करत आहेत. नेमके किती ड्रोन पाकिस्तानमधून जम्मूमध्ये आणले गेले आहेत, त्याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. भविष्यातील अशा प्रकारच्या हल्ल्यांना निकामी करण्यासाठी यंत्रणा सज्ज असून एअरफोर्स आणि जम्मू काश्मीर पोलीस एकत्रितरित्या यावर काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
  Published by:desk news
  First published: