श्रीनगर 13 ऑगस्ट : जम्मू-काश्मीर सरकारने बिट्टा कराटेच्या पत्नीसह चार सरकारी कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं आहे. दहशतवादी संबंधांमुळे चौघांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचं सरकारी सूत्रांनी सांगितलं. या सर्वांचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप आहे तसंच ते काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या प्रकरणातही आरोपी आहेत. इथे भाड्याने पोलीस मिळतील; इतक्या हजारात संपूर्ण पोलीस ठाणं करता येतं बुक दहशतवादी संबंधांमुळे चौघांनाही सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. बिट्टा कराटे हा दहशतवादी असून त्याने स्वत: काश्मिरी पंडितांच्या हत्येत हात असल्याची कबुली दिली आहे.
J&K govt sacks four Govt employees, including the wife of Bitta Karate who is facing terror charges and is an accused in the matter of killing of Kashmiri pandits. The four have been dismissed from services for terror links: Govt Sources pic.twitter.com/wlv5PPgxho
— ANI (@ANI) August 13, 2022
‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर बिट्टा कराटेचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. त्याच्यावर 20 निरपराध काश्मिरी पंडितांची सामूहिक हत्या केल्याचा आरोप आहे. तरीही या प्रकरणात त्याला शिक्षा होऊ शकलेली नाही. जो लौट के घर ना आए.. बहिणीचा शेवटचा फोन, मुलीचा व्हिडिओ कॉल… राजौरीतील 4 शहीद जवानांची कहाणी काश्मीर खोऱ्यातील कोणत्याही उपद्रव किंवा दहशतवादी घटनेमागे मोठी भूमिका बजावणाऱ्या काही लोकांपैकी बिट्टा कराटे हा एक असल्याचं म्हटलं जातं. असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत ज्यात बिट्टा कराटे पैसे देऊन घाटीत दगडफेकीसाठी तरुणांना भडकवताना दिसत आहे.