मराठी बातम्या /बातम्या /देश /

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, JCO सहित 2 जवान शहीद

जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला, JCO सहित 2 जवान शहीद

लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

    श्रीनगर, 15 ऑक्टोबर: जम्मू -काश्मीरच्या (Encounter in Poonch District) पुंछ जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. गुरुवारी रात्री पुंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ज्युनियर कमिशन अधिकाऱ्यासह (JCO) लष्कराचे दोन जवान शहीद झाले. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, ऑपरेशन अजूनही सुरू आहे आणि लष्कराच्या जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. काउंटर टेररिस्ट ऑपरेशन दरम्यान हल्ला संरक्षण जनसंपर्क अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, मेंढर उपविभागातील नार खास भागात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी (Counter-Terrorist Operation) कारवाईमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. गोळीबारादरम्यान, एक जेसीओ आणि एक सैनिक गंभीर जखमी झाले, ज्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा- मोठी बातमी:  समीर वानखेडेंची मुंबई पोलीस करणार चौकशी पुंछला जाणारा रस्ता बंद पुंछ जिल्ह्यातील (Poonch District) मेंढरच्या भटाधुडिया भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कराने परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. सुरक्षेच्या दृष्टीने भींबर गली ते पूंछ हा रस्ता बंद करण्यात आला. सोमवारी पुंछमध्ये 5 जवान शहीद झाले यापूर्वी सोमवारी पुंछमध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती, ज्यात जेसीओसह पाच सैनिक शहीद झाले होते. गुप्तचर माहिती मिळताच सुरक्षा दलाची तुकडी दहशतवाद्यांच्या शोधात ऑपरेशनसाठी पीर पंजालच्या जंगलात गेली होती, तिथे दहशतवाद्यांनी घातपात घडवून आणत जवानांवर हल्ला केला, ज्यात 5 जवान शहीद झाले. हेही वाचा- IPL 2021 Final Live Streaming: KKR vs CSK फायनल कधी आणि कुठे पाहता येणार?  केंद्रशासित प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून दहशतवादी घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे, त्यानंतर लष्कर दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन चालवत आहे. अलीकडेच पुंछ जिल्ह्यात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवादविरोधी कारवाई केली, ज्यात पाच जवान शहीद झाले. दहशतवादी नियंत्रण रेषा ओलांडून चामेर जंगलात पोहोचले होते. गुप्त माहिती मिळताच सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले आणि चकमक सुरू झाली. या चकमकीत जेसीओसह 5 जवान शहीद झाले. या जवानांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या हल्ल्यात ठार झालेल्या सैनिकांमध्ये नायब सुभेदार (जेसीओ) जसविंदर सिंग, नाईक मनदीप सिंग, शिपाई गजान सिंग, सराज सिंह आणि वैशाख एच यांचा समावेश होता. हेही वाचा- भारत उडवणार चीनची झोप,  LAC वर सुरुय मोठ्या बोगद्याचं काम दहशतवाद्यांचा बदला घेत अवघ्या 24 तासांच्या आत सुरक्षा दलांनी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केला. यातील काही दहशतवादी नागरिकांना लक्ष्य करण्यात सहभागी होते. अनंतनागमध्ये लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले, तर बांदीपोरा येथेही एका दहशतवाद्याला ठार केले. त्याचवेळी शोपियानमध्ये एकूण चार दहशतवादी मारले गेले.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Jammu and kashmir, Terror attack

    पुढील बातम्या