मराठी बातम्या /बातम्या /देश /

भारत LAC वर जगातील सर्वात लांब बोगद्याच्या कामाला सुरुवात, चीनला बसणार मोठा दणका

भारत LAC वर जगातील सर्वात लांब बोगद्याच्या कामाला सुरुवात, चीनला बसणार मोठा दणका

गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी स्फोटाद्वारे मुख्य ट्यूबचं रस्ता खोलण्यासाठी बटण दाबलं.

गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी स्फोटाद्वारे मुख्य ट्यूबचं रस्ता खोलण्यासाठी बटण दाबलं.

गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी स्फोटाद्वारे मुख्य ट्यूबचं रस्ता खोलण्यासाठी बटण दाबलं.

  नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर: पूर्व लडाखमध्ये (Eastern Ladakh) लाईन ऑफ एक्चुअल कंट्रोलवर (LAC) भारत- चीन तणावादरम्यान अरुणाचल (Arunachal Pradesh) प्रदेशमध्ये सेला टनलचं (Sela Tunnel) खोदकाम पूर्ण झालं आहे. गुरुवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Defense Minister Rajnath Singh) यांनी स्फोटाद्वारे मुख्य ट्यूबचं रस्ता खोलण्यासाठी बटण दाबलं. हा बोगदा भारतीय लष्करासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या बोगद्याद्वारे भारतीय लष्कराला सर्व हवामानात एलएसीपर्यंत (Line of Actual Control) पोहोचण्यासाठी तसंच आवश्यक वस्तू पोहोचवण्याकरिता ही सोपं जाईल. शिवाय, या बोगद्यामुळे (Tunnel) वेळेचीही बचत होईल. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यावर, 1.5 किमी पेक्षा जास्त लांबीचा हा बोगदा 13,000 फूट उंचीवर जगातील सर्वात लांब डबल लेन रोड बोगद्यांपैकी एक असेल. आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेल्या या बोगद्यावर हिमवर्षावाचाही परिणाम होणार नाही. हेही वाचा- Anant Karamuse Case : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि तत्काळ सुटका!
   यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, अरुणाचल प्रदेशचा सेल बोगदा राष्ट्रीय सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि या प्रदेशाचा सामाजिक-आर्थिक विकास सुनिश्चित करण्यात महत्वाची भूमिका बजावेल. हा अत्याधुनिक बोगदा केवळ तवांगसाठीच नव्हे तर संपूर्ण राज्यासाठी जीवनरेखा ठरेल.
  भारतासाठी का खास आहे हा बोगदा? हा बोगदा सेला खिंडीतून जातो आणि त्याच्या बांधणीनंतर तवांग ते चीन सीमेचे अंतर 10 किमी कमी होण्याची शक्यता आहे. हे अरुणाचल प्रदेशातील तवांग आणि पश्चिम कामेंग जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले आहे. या प्रकल्पात दोन बोगदे बांधले जात आहेत. बोगदा 1 सुमारे 980 मीटर लांब आहे, तर बोगदा क्रमांक 2, जो ट्विन टनल बोगदा आहे, त्याची लांबी सुमारे 1555 मीटर आहे. हेही वाचा-  भाजपचा ‘दसरा स्पेशल’ कार्यक्रम, करणार सरकारच्या घोटाळ्याच्या पुतळ्याचे दहन
   या बोगद्याच्या मदतीने आसाममधील तेजपूर येथील लष्कराच्या 4 कॉर्प्स मुख्यालय आणि तवांग दरम्यानच्या प्रवासाचा वेळ सुमारे एक तास कमी होईल.
  लष्करी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की या बोगद्याचे बांधकाम जून 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या बोगद्याच्या बांधणीनंतर, बोमडिला आणि तवांग दरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग 13 चा 171 किलोमीटरचा हा जो रस्ता असेल, तो सर्व हवामानात उपयोग होईल. ज्यामुळे पर्यटकांसह इतर आवश्यक रहदारीस मदत मिळेल.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: India china

  पुढील बातम्या