मुंबई, 15 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून मुंबई (Mumbai) एका प्रकरणाची चर्चा सुरु आहे, ती म्हणजे एनसीबीनं (NCB) क्रूझवर ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश केल्याची. त्यात ही कारवाई करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (NCB zonal director Sameer Wankhede) हे देखील तितकेच चर्चेत आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार, एनसीबी अधिकार समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस (Mumbai Police) चौकशीसाठी समन्स (summons) पाठवणार आहेत.
स्वतः समीर वानखेडे यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई पोलीस पाळत ठेवत असल्याची तक्रार राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे केली होती. त्याच तक्रारीनंतर समीर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहेत. तक्रारीचा भाग म्हणून समीर वानखेडेंची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा- भारत उडवणार चीनची झोप, LAC वर सुरुय मोठ्या बोगद्याचं काम
11 ऑक्टोबर रोजी माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा समीर वानखेडेंनी केला होता त्यामुळे त्यांनी मुंबई पोलिसांत या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी चौकशी सुरु केली असल्याची माहिती मिळत आहे. त्यातच समीर वानखेडेंनी सादर केलेल्या पुराव्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी काही प्रश्न विचारल्याचं समजतंय. वानखेडे यांनी दिलेल्या पुराव्यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचा समावेश होता.
त्यांनी दिलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारे दोन पोलीस हे ओशिवाराच्या डिटेक्शन विभागाचे आहेत. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिले आहेत. या पुराव्यामध्ये ज्या दोन कर्मचाऱ्यांचे फोटो समोर आलेत. त्यानंतर मुंबई पोलिसांनी दोन पोलिसांची चौकशी देखील केली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा-Anant Karamuse Case : मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि तत्काळ सुटका!समीर वानखेडेंच्या नेतृत्त्वात छापेमारी
2 ऑक्टोबरला समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वात एनसीबीनं मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा मारला. या छापेमारी एनसीबीनं ड्रग्ज पार्टीचा पदार्फाश केला. या प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली आहे.
आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला
येत्या 20 ऑक्टोबर रोजी आर्यन खान याच्या जामीन अर्जावर निर्णय सुनावण्यात येणार असल्याचं कोर्टाकडून सांगण्यात आलं आहे. NCB चे वकिल अनिल सिंह यांनी सांगितलं की, आर्यन आणि अरबाजच्या चौकशीतून ड्रग्ज प्रकरणातील मोठा कट उघड होऊ शकतो. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ नये. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे पुढील 6 दिवस त्याला तुरुंगात राहावं लागणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.