श्रीनगर, 26 जून: जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) दहशतवाद्यांच्या कारवाया सुरूच असल्याचं दिसत आहे. शनिवारी पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी सैन्य दलाला लक्ष करत हल्ला केला. श्रीनगर (Srinagar)मधील बाबरशाह परिसरात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला (Grenade attack on CRPF team) केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही क्रमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
शनिवारी श्रीनगरमधील बाबरशाह परिसरात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यातून सीआरपीएफ पथकाचे जवान बचावले मात्र, तीन नागरिक जखमी झाले आहेत. या घटनेननंतर दहशतवाद्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला असून सीआरपीएफ आणि पोलीस पथक दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत.
#WATCH| Jammu and Kashmir: CCTV footage of the grenade attack on CRPF party that left three civilians injured at Barbar Shah in Srinagar, earlier today pic.twitter.com/7aJ3D0VqpD
— ANI (@ANI) June 26, 2021
LIVE VIDEO: धरणावर मौजमस्ती पडली महागात; दोघे गेले वाहून, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बचावले
एक दिवसापूर्वी म्हणजेच 25 जून रोजी जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलाने केलेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार झाला हता तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले होते. शोपियान जिल्ह्यातील हंजीपोरा परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळताच सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला घेरलं आणि शोधमोहिम हाती घेतली.
यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा रक्षकावर गोळीबार केला त्यानंतर सैन्यदलानेही त्यांना प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. यावेळी झालेल्या चकमकीत एक दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला तर एका दहशतवाद्याने आत्मसमर्पण केले अशी माहिती स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cctv, Jammu kashmir, Srinagar