जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / LIVE VIDEO: धरणावर मौजमस्ती पडली महागात; दोघे गेले वाहून, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बचावले

LIVE VIDEO: धरणावर मौजमस्ती पडली महागात; दोघे गेले वाहून, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बचावले

LIVE VIDEO: धरणावर मौजमस्ती पडली महागात; दोघे गेले वाहून, ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे बचावले

पावसाळ्यात नदी, धरण, धबधब्यांवर नागरिक पिकनिकसाठी जात असतात अशाच प्रकारे सिंधुदुर्गात तरुण मजामस्ती करत असताना दोघेजण वाहून गेले.

  • -MIN READ
  • Last Updated :

सिंधुदुर्ग, 26 जून: पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटनस्थळे, धबधबे (Waterfall), धरणांवर (Dam) नागरिकांना जाण्यास मज्जाव घातला आहे. मात्र असे असतानाही काही अतिउत्साही तरुण नियमांकडे दुर्लक्ष करुन मजामस्ती करण्यासाठी पर्यटनस्थळावर दाखल होता. अशाच प्रकारे सिंधुदुर्गात (Sindhudurg) धरणावर मजामस्ती करणं दोन तरुणांच्या चांगलेच अंगलट आले. मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गातील माडखोल धरणावर (Madkhol Dam) मजामस्ती करण्यासाठी कारिवडे येथील काही तरुण गेले होते. त्याचवेळी धरणातील पाण्याचा जोर वाढला आणि दोन तरुण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. सुदैवाने स्थानिक ग्रामस्थांनी हे पाहिलं आणि त्यांनी प्रसंगावधान दाखवत मदतीसाठी धाव घेतली.

जाहिरात

मुंबईतील ताज हॉटेलमध्ये धमकीचा फोन साताऱ्यातून; 14 वर्षीय मुलाने कॉल केल्याचं उघड दोन तरुण वाहून जात असल्याचं लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनी मोठा दोरखंड या मुलांच्या दिशेने फेकला आणि त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. सुमारे तासभर हे बचावकार्य सुरू होते. अखेर तासाभरानंतर या दोन्ही तरुणांना ग्रामस्थांनी सुखरूप बाहेर काढले आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून या दोन्ही तरुणांचे प्राण वाचले आहेत. जर त्या ठिकाणी ग्रामस्थ नसते तर काय झालं असतं? नागरिकांनी अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालण्याचे कोणतेही धाडस करु नये असे आवाहन प्रशासनाकडून वारंवार कऱण्यात येत असते. मात्र, तरिही नागरिक याकडे सर्रास कानाडोळा करत असतात. नागरिकांनी या सर्व नियमांचे गांभीर्याने लक्ष देत पालन करणे आवश्यक आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात