जाहिरात
मराठी बातम्या / देश / ISRO : इस्त्रोची देशाला दिवाळी भेट, ग्लोबल मार्केटमध्ये रचला इतिहास!

ISRO : इस्त्रोची देशाला दिवाळी भेट, ग्लोबल मार्केटमध्ये रचला इतिहास!

 इस्रोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सव्हिस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदवला आहे.

इस्रोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सव्हिस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदवला आहे.

इस्रोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सव्हिस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदवला आहे.

  • -MIN READ Andhra Pradesh
  • Last Updated :

श्रीहरीकोटा, 23 ऑक्टोबर : भारतीय अंतराळ संस्था इस्त्रोने देशाला दिवाळीची खास भेट दिली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आपल्या सर्वात वजनदार रॉकेटचे पहिले व्यावसायिक प्रक्षेपण केलं. इस्रोचं रॉकेट LVM-3 आकाशाकडे झेपावल्यामुळे भारतानं ग्लोबल कमर्शियल लॉन्च मार्केटमध्ये एक नवीन इतिहास रचला आहे. इस्त्रोने आज नव्याने दमदार कामगिरी केली आहे. इस्रोच्या रॉकेट LVM-3 चं यशस्वी प्रक्षेपण पार पडलं. या प्रक्षेपणासह, इस्रोनं सर्व भारतीयांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. 36 उपग्रह  प्रक्षेपणांच्या या मिशनसाठी, इस्रोनं आपलं सर्वात वजनदार रॉकेट ‘LVM-3’ म्हणजेच लाँच व्हेईकल मार्क 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा इथून प्रक्षेपित केलं.

जाहिरात

या मिशनमध्ये ब्रिटिश स्टार्टअप वनवेबचे 36 उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले. वनवेब ही एक खाजगी उपग्रह संपर्क कंपनी आहे. इस्रोने ग्लोबल कमर्शियल लॉन्च सव्हिस मार्केटमध्ये आपला प्रवेश नोंदवला आहे. (Covid-19 Variant : ओमिक्रॉनचा नवीन सब-व्हेरियंट भारतात दाखल; BF.7 मुळे वाढली चिंता) वनवेबही एक खासगी उपग्रह प्रक्षेपित करणारी कंपनी आहे. भारती एंटरप्राइजेज एक प्रमुख गुंतवणूक आणि भागीदार असलेली कंपनी आहे. रविवारी 43.5 मीटर उंच रॉकेट सतीश धवन अंतराळ केंद्रातून मध्यरात्री 12 वाजून 7 मिनिटांनी प्रक्षेपित करण्यात आले. या रॉकेटची क्षमता 8,000 किलोग्राम इतकी आहे. (प्रायव्हेट विमानातून जगप्रवासाला निघालंय हे कुटुंब; अनोख्या प्रवासाचा VIDEO व्हायरल) हे मिशन इस्त्रोसाठी महत्त्वाचं होतं. कारण, व्यावसायिक क्षेत्रात हे पहिले मिशन होते आणि प्रक्षेपण यानसोबत एनएसआईएलची ही पहिलीच मोहीम होती. वनवेबच्या 5,796 किलोग्राम वजनाच्या 36 उपग्रहांसोबत अंतराळात जाणारे पहिले भारतीय रॉकेट बनले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: isro
  • First Published :
जाहिरात
जाहिरात