मराठी बातम्या /बातम्या /देश /Yogi Adityanath Interview : CM योगींनी राहुल गांधींना दिला सल्ला, सांगितलं काँग्रेसच्या नुकसानीचे कारण

Yogi Adityanath Interview : CM योगींनी राहुल गांधींना दिला सल्ला, सांगितलं काँग्रेसच्या नुकसानीचे कारण

प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. पण, देशाला त्यांनी त्यांचा हेतू काय आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे,

प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. पण, देशाला त्यांनी त्यांचा हेतू काय आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे,

प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. पण, देशाला त्यांनी त्यांचा हेतू काय आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे,

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी : '1947 पासून राहुल गांधी काय करत होते. देशात जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर क्षेत्र आणि भाजेचा आधार घेऊन फाळणी तर काँग्रेसच्या काळात झाली आहे. जे त्यांना वारस हक्काने मिळालं आहे, ते देशाला परत करत आहे. हे तेच करत आहे. राहुल गांधी हे आपली नकारात्मक प्रतिमा सोडली तर काँग्रेसला फायदा होईल' असा सल्ला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधी यांना दिला.

ग्लोबल इन्वेस्टर्स समिटमध्ये Network18 के एडिटर-इन-चीफ राहुल जोशी हे योगी आदित्यनाथ यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये उत्तर प्रदेशचा विकासाच्या ब्लू प्रिंटबद्दल योगी आदित्यनाथ खुलासा केला आहे. तसंच राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेवरून सल्ला दिला.

" isDesktop="true" id="825864" >

'1947 पासून राहुल गांधी काय करत होते. देशात जातीच्या नावावर आणि समाजाच्या नावावर क्षेत्र आणि भाजेचा आधार घेऊन फाळणी तर काँग्रेसच्या काळात झाली आहे. जे त्यांना वारस हक्काने मिळालं आहे, ते देशाला परत करत आहे. हे तेच करत आहे. राहुल गांधी हे आपली नकारात्मक प्रतिमा सोडली तर काँग्रेसला फायदा होईल. पण, ते तसं करत नाही. ते त्यांच्या प्रयत्नावर पाणी फेरत आहे. कोणत्या कार्यक्रमामध्ये गर्दी असणे म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळाला असं नसतं. सर्व सामन्य लोकांवर याचा काय फरक पडला, त्यांनी याचा कसा विचार केला हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक पक्षाला आपले कार्यक्रम करण्याचा अधिकार आहे. पण, देशाला त्यांनी त्यांचा हेतू काय आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे, असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी राहुल गांधींना फटकारलं.

(Yogi Adityanath Interview : बॉलिवूडच्या बॉयकॉट कल्चरवर योगी आदित्यनाथांची सडेतोड प्रतिक्रिया, म्हणाले...)

विकास कामावरून लक्ष हटवण्यासाठी राम चरित्र मानस याच्यावर विधानं केली जात आहे. लोकसभेमध्ये जेव्हा याचे प्रश्न येईल, तेव्हा त्याचे उत्तर दिले जाईल. राम चरित्र मानस हे पवित्र ग्रंथ आहे. त्याच्याबद्दल मोठी आस्था आहे, उत्तर भारतातील प्रत्येक घरात मंगल कार्य होते, तेव्हा याचे पठण केले जात असते. राम चरित्र हे लोकांना जोडणारे आहे. ऑक्टोबर महिन्यात प्रत्येक गावात राम चरित्र मानसाचे वाचण केले जात आहे. राम चरित्र मानसमध्ये निसाद राज आणि शबरीचे सुद्धा चित्र आहे. हे बुद्धीचा फेरा आहे. ज्या लोकांना राम चरित्र मानसाची माहिती असती तर त्यांनी यावर आक्षेप घेतला नसता, टीका केली नसती.

(एमपी, राजस्थान, कर्नाटक, छत्तीसगड निवडणुकीत भाजपचं काय होणार? योगींचं भविष्य!)

फाळणीच्या मुद्यावर उत्तर प्रदेशच्या जनतेनं खूप काही सहन केलं आहे. फाळणीमुळे आपली ओळख पटवण्याचे कारण सुद्धा सहन केले आहे. उत्तर प्रदेशची जनतेनं कायम विभाजन करणाऱ्या लोकांना फटकारलं आहे. 2014, 2017 मध्ये नाकारलं आणि आता 2019 मध्येही जनतेनं त्यांना नकार दिला आहे. पुढेही देतील, असंही आदित्यनाथ यांनी विरोधकांना सुनावलं.

First published:

Tags: Rahul gandhi