जाहिरात
मराठी बातम्या / देश / Yogi Adityanath Interview : बॉलिवूडच्या बॉयकॉट कल्चरवर योगी आदित्यनाथांची सडेतोड प्रतिक्रिया, म्हणाले...

Yogi Adityanath Interview : बॉलिवूडच्या बॉयकॉट कल्चरवर योगी आदित्यनाथांची सडेतोड प्रतिक्रिया, म्हणाले...

योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशात सुरू असलेल्या बॉयकॉट कल्चरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

  • -MIN READ Delhi,Delhi,Delhi
  • Last Updated :

    लखनऊ, 5 जानेवारी : सध्या देशात बॉयकॉट कल्चर जोरदार सुरू आहे. यातून अनेक चित्रपट हे फ्लॉप देखील ठरले आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देशात सुरू असलेल्या बॉयकॉट कल्चरवर आपलं मत व्यक्त केलं आहे. ते ‘नेटवर्क 18’ चे एडिटर -इन-चीफ राहुल जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये बोलत होते. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटाची निर्मीती करताना लोकांच्या भावनेचा आदर ठेवावा असं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हटलं योगी आदित्यनाथ यांनी? योगी आदित्यनाथ यांनी बॉयकॉट कल्चरवर आपलं रोखोठोक मत व्यक्त केलं आहे. चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक यांनी चित्रपटाची निर्मीती करताना लोकांच्या भावनेचा आदर ठेवावा. एखाद्या कलाकृतीची निर्मीती करताना लोकांच्या भावनेला ठेच पोहोचणार नाही याकडे विशेष लक्ष द्यायला हवे. जर तुम्ही एखादी गोष्ट मुद्दामहून केली नसेल तर ती वेगळी गोष्ट आहे. मात्र जर जाणूनबुजून केली जात असेल तर हे चुकीचं आहे. उत्तर प्रदेशची आपली एक वेगळी चित्रपट पॉलिसी आहे. सध्या राज्यात पहिल्यापेक्षा अधिक चित्रपटाचे चित्रिकरण सुरू आहे. ज्या व्यक्तींमध्ये विशेष प्रतिभा असते त्या सर्वांचा सन्मान झाला पाहिजे आणि हे काम आमचं सरकार करत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. गुंतवणुकीला चालना दरम्यान यावेळी बोलताना उत्तर प्रदेशमध्ये सध्या कशापद्धतीनं गुंतवणूक वाढत आहे, याबाबत देखील त्यांनी माहिती दिली. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणणार आहे. आमच्याकडे उद्योग, आणि शेती क्षेत्रामध्ये काम करण्याची मोठी संधी आहे. पुरसं मनुष्यबळ आहे. ग्लोबल समिटमध्ये आम्ही जास्तीत जास्त गुंतवणूक आणणार आहोत. उत्तर प्रदेशचा विकास दर हा 13 ते 14 टक्के इतका आहे. देशातील 20 टक्के खाद्य उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी यावेळी म्हटलं.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात