नवी दिल्ली, 26 जुलै: स्वदेशी निर्मितीची पहिली विमानवाहक युद्धनौका INS विक्रांत लवकरच भारतीय नौदलात सामील होण्याची शक्यता आहे. या युद्धनौकेची बेसिन चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही युद्धनौका खोल समुद्रात चाचणीसाठी उतरवण्यात येणार आहे. याचं परिक्षण हिंदी महासागरात करण्यात येणार आहे. परिक्षण पूर्ण झाल्यानंतर ही युद्धनौका चीनी समुद्राच्या सीमा रेषेजवळ तैनात करण्यात येणार आहे. त्यामुळे आता चीनचे मनसुबे चालणार नाहीत.
नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वदेशी निर्मितीची पहिली महाकाय युद्धनौका INS विक्रांतचं काम पूर्ण झालं आहे. पण रणभूमीवर तैनात करण्यापूर्वी करण्यात येणार औपचारीक परिक्षण बाकी आहे. पुढच्या महिन्यात जेव्हा ही युद्धनौका खोल समुद्रात परिक्षणासाठी उतरवली जाईल, तेव्हा पूर्ण क्षमतेनं याचं परिक्षण केलं जाणार आहे. यासाठी जास्तीत जास्त तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. खरंतर, योजनेनुसार ही युद्धनौका रणभूमीवर उतरवण्यासाठी तीन वर्षांचा विलंब झाला आहे. 2018 मध्येच ही नौका भारतीय नौदलात सामील होणं अपेक्षित होतं.
हेही वाचा-तालिबान्यांनी 100 निष्पाप अफगाणांना केले ठार, झेंडे फडकावून साजरा केला उत्सव
समुद्रातील चाचण्या पूर्ण झाल्यानंतर, कोचिन शिपयार्ड ही युद्धनौका भारतीय नौदलाकडे सोपवणार आहे. यानंतर भारतीय नौदल देखील काही प्रमुख चाचण्या करणार आहे. त्यानंतर ही युद्धनौका चीनी समुद्र सीमेवर तैनात करण्यात येणार आहे. सर्वकाही अपेक्षेप्रमाणं घडलं तर 2022 च्या मध्यापर्यंत ही महाकाय युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताब्यात सामील होण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगानं पावलं उचलायला सुरुवात केली आहे.
हेही वाचा-चीनने लाँच केली हवेत तरंगणारी वेगवान बुलेट ट्रेन; विमानाएवढा आहे वेग
सध्या भारताकडे केवळ INS विक्रमादित्य ही एकच विमानवाहक युद्धनौका आहे. ही युद्धनौका काही वर्षांपूर्वी रशियाकडून विकत घेण्यात आली होती. ही युद्धनौका सध्या अरबी समुद्रात कारवार जवळ तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे आता INS विक्रांतला दक्षिण हिंदी महासागरात तैनात केलं जाणार आहे. त्यामुळे चीनपासून असणाऱ्या धोक्याशी दोन हात करणं शक्य होणार आहे.
हेही वाचा-जीव वाचवण्यासाठी धावली ऑक्सिजन एक्स्प्रेस, PM मोदींची बांगलादेशला मोठी मदत
INS विक्रांत या महाकाय युद्धनौकेत 40 विमानं प्रत्येक वेळी उड्डाण घेण्यासाठी सज्ज राहू शकतात. त्याचबरोबर मीग-29 सारखे 26 आधुनिक विमानं एकाच वेळी या युद्धनौकेवर तैनात केले जाऊ शकतात. तसेच दहा लहान हेलिकॉप्टर देखील याठिकाणी ठेवले जाऊ शकतात. या INS विक्रांतची एकूण लांबी तब्बल 260 मीटर एवढी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, India, India china, Indian navy, International, Navy