मराठी बातम्या /बातम्या /विदेश /चीनने लाँच केली हवेत तरंगणारी वेगवान बुलेट ट्रेन; विमानाएवढा आहे वेग

चीनने लाँच केली हवेत तरंगणारी वेगवान बुलेट ट्रेन; विमानाएवढा आहे वेग

या बुलेट ट्रेनबद्दल ती खरंच वाऱ्याशी स्पर्धा करते हे शब्दशः खरं ठरेल. कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय हवेत तरंगणारी ही बुलेट ट्रेन आहे हे विशेष

या बुलेट ट्रेनबद्दल ती खरंच वाऱ्याशी स्पर्धा करते हे शब्दशः खरं ठरेल. कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय हवेत तरंगणारी ही बुलेट ट्रेन आहे हे विशेष

या बुलेट ट्रेनबद्दल ती खरंच वाऱ्याशी स्पर्धा करते हे शब्दशः खरं ठरेल. कुठल्याही खांबाच्या आधाराशिवाय हवेत तरंगणारी ही बुलेट ट्रेन आहे हे विशेष

    बीजिंग, 23 जुलै: चीन (China) हा जगातला एक असा देश आहे, की जिथे अशा अनेक गोष्टी (Weird Things in China) पाहायला मिळतात, ज्यावर पटकन विश्वास बसत नाही. चित्रविचित्र प्रकारच्या शोधांसाठी हा देश ओळखला जातो. आणि हेही खरं आहे, की हा देश असे काही शोध लावतो ज्यांचं कौतुक करायलाच हवं. गेल्या आठवड्यात चीनने जगातली सर्वांत वेगवान बुलेट ट्रेन (World's fastest bullet train) सादर केली. या बुलेट ट्रेनबद्दल असं म्हटलं जातं, की ती खरंच वाऱ्याशी स्पर्धा करते. ही बुलेट ट्रेन (China bullet train) विमानापेक्षाही कमी वेळात प्रवाशांना पोहोचवू शकते. कारण त्या बुलेट ट्रेनचा वेग आहे ताशी 600 किलोमीटर.

    चीनची ही बुलेट ट्रेन जगातली सर्वांत वेगवान ट्रेन असल्याचं सांगितलं जात आहे. इतक्या प्रचंड वेगामुळे ही ट्रेन डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच डोळ्यांसमोरून गायब होते. news.com.au ने दिलेल्या वृत्तानुसार, ही ट्रेन खरंच विमानापेक्षाही (Aeroplane) वेगवान आहे. या ट्रेनच्या वेगाने अनेक विक्रम मोडले आहेत. ही ट्रेन इलेक्ट्रोमॅग्नेट अर्थात विद्युतचुंबकीय (Electromagnetic) तत्त्वावर चालते.

    रशियात आलं डासांचं वादळ; Video पाहून तुमचाही उडेल थरकाप

    चीनची ही नवी सर्वांत वेगवान बुलेट ट्रेनकिंगदाओ येथेतयार करण्यात आली असून, तिथेच ती या आठवड्यात सादर (Bullet Train Launched in China) करण्यात आली. जपानच्या (Japan) सर्वांत वेगवान ट्रेनचा विक्रम या ट्रेनने मोडला आहे. सहा वर्षांपूर्वी जपानमधल्या ट्रेनने सर्वांत जास्त वेगाचा विक्रम केला होता. 2015मध्ये जपानमधल्या यामानाशी (Yamanashi) येथे त्या ट्रेनची चाचणी झाली होती. आता चीनने तो विक्रम मोडला आहे.

    चायना रेल्वे रोलिंग स्टॉक कॉर्पोरेशन (China Railway Rolling Stock Corporation) या सरकारी कंपनीने ही बुलेट ट्रेन (Bullet Train) तयार केली आहे. या कंपनीच्या उपमहासंचालकांनी सांगितलं, की या बुलेट ट्रेनचा आवाज कमी आहे. तसंच अन्य बुलेट ट्रेनच्या तुलनेत या ट्रेनचा मेन्टेनन्सही कमी आहे.

    फक्त आपल्याकडेच नाही जगभरात यंदा पावसाचा हाहाकार!पाहा PHOTO

    तिकडे ब्रिटनमध्ये (UK) मात्र लोक ट्रेनच्या कमी स्पीडमुळे त्रस्त आहेत. तिथले लोक म्हणतात, की आमच्या देशातल्या ट्रेन्स घोडागाडीच्या वेगाने धावतात. ब्रिटनमधली सर्वांत वेगवान ट्रेन ताशी 199 मैल वेगाने धावते. चीनच्या नव्या वेगवान बुलेट ट्रेनशी तुलना केली, तर ब्रिटनच्या सगळ्या ट्रेन जणू खेळण्यातल्याच ठरणार आहेत.

    First published:

    Tags: Bullet train, China, Train