• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • वसुधैव कुटुम्बकम्! जीव वाचवण्यासाठी धावली ऑक्सिजन एक्स्प्रेस, PM मोदींची बांगलादेशला मोठी मदत

वसुधैव कुटुम्बकम्! जीव वाचवण्यासाठी धावली ऑक्सिजन एक्स्प्रेस, PM मोदींची बांगलादेशला मोठी मदत

आज सकाळी भारतानं तब्बल 200 मेट्रीक टन द्रव्य स्वरुपातला ऑक्सिजन बांगलादेशासाठी पाठवला आहे. याबाबतची माहिती भारताचे नवे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 जुलै: मागील दीड वर्षांपासून भारतासह संपूर्ण जगभर कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. त्यामुळे अनेक देशातील आरोग्य यंत्रणा कोलमडून गेल्या आहेत. त्यामुळे शेजारील देश म्हणून अनेक देश एकमेकांना वैद्यकीय मदत पुरवत आहेत. कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत अनेक देशांनी भारताला देखील मदतीचा हात दिला होता. आता भारतानं देखील आपला शेजारील देश बांगलादेशला ऑक्सिजन पाठवला आहे. आज सकाळी पहिल्यांदाच ऑक्सिजन एक्स्प्रेस बांगलादेशासाठी रवाना झाली आहे. एक शेजारील राष्ट्र म्हणून भारत नेहमीच बांगलादेशाच्या मदतीला धावून गेला आहे. आज सकाळी भारतानं तब्बल 200 मेट्रीक टन द्रव्य स्वरुपातला ऑक्सिजन बांगलादेशासाठी पाठवला आहे. याबाबतची माहिती भारताचे नवे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. त्यांनी संबंधित ट्वीटमध्ये एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ऑक्सिजन एक्स्प्रेस काही ऑक्सिजन टँक घेऊन जाताना दिसत आहेत. या ट्वीटमध्ये केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात माणुसकीच्या नात्यातून शेजारील राष्ट्राला कोरोना विषाणूच्या लढ्यात मदतीचा हात देत आहेत. वसुधैव कुटुम्बकम या संदेशाचं आचरण करत बांगलादेशला ऑक्सिजन पुरवठा करण्यात आला आहे. आज सकाळी पहिल्यांदाच ऑक्सिजन एक्स्प्रेस भारतातून बांगलादेशासाठी रवाना झाली आहे. या ऑक्सिजन एक्सप्रेसमधून द्रव्य स्वरुपातला वैद्यकीय वापरातला तब्बल 200 मेट्रीक टन ऑक्सिजन पाठवण्यात आला आहे.'
  Published by:News18 Desk
  First published: