Home /News /national /

रुग्णालयातून पळून घरी गेला कोरोना रुग्ण; आता पत्नी, मुलींसह 12 लोकांना झाली लागण

रुग्णालयातून पळून घरी गेला कोरोना रुग्ण; आता पत्नी, मुलींसह 12 लोकांना झाली लागण

इंदूरमधील तंजीम नगर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून पळून आपल्या घरी गेला. त्याच्यामुळे आता पत्नी आणि मुलांसह 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

    इंदूर, 02 एप्रिल : भारतातील सर्व राज्यांमध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळं देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. असले तरी दिवसेंदिवस कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तर, काही रुग्ण कोरोनाला घाबरून रुग्णालयातूनच पळून जात आहे. इंदूरमध्येही असाच प्रकार घडला. इंदूरमधील तंजीम नगर येथे एक कोरोनाबाधित रुग्ण रुग्णालयातून पळून आपल्या घरी गेला. त्याच्यामुळे आता पत्नी आणि मुलांसह 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. इंदूरमधील हा 42 वर्षीय रुग्ण पळून गेल्यानंतर शहरात खळबळ माजली होती. मात्र काही दिवसांनंतर तो घरातच असल्याचे समोर आला. आता त्याच्या संपर्कात आलेल्या 9 जणांना संसर्ग झाला आहे. 28 मार्च रोजी हा रुग्ण हॉस्पिटलमधून पळून गेला होता. त्याने असे सांगितले होते की, तो कधीही परदेशात गेला नाही आणि कोणताही आजार नाही आहे. मात्र त्यानंतर त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. वाचा-कोरोनाच्या भीतीनं डॉक्टरांनी 5 महिन्याच्या मुलाला तपासलं नाही, चिमुकल्याचा अंत या रुग्णाच्या कुटुंबात एकूण 16 जण आहे. हे कुटुंब दुमजली परंतु छोट्या घरात राहतात. त्यामुळं एकमेकांच्या संपर्कात येऊन त्यांना कोरोनाची लागण झाली. आरोग्य विभागाने घरातील 54 जणांची चाचणी केली. त्यातील 12 जण पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. यात त्यांची पत्नी, दोन मुली, भाऊ आणि भाडेकरू यांना समावेश आहे. वाचा-नवजात बाळ आणि आईला दिला कोरोना रुग्णाचा खाली झालेला बेड, दोघे पॉझिटिव्ह आरोग्य विभागाच्या वतीने हा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण परिसराची चौकशी केली. यात प्रायमरे कॉन्टॅक्ट (रुग्णांसोबत संपर्क) आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट (सामुहिक प्रसार) यांची यादी तयार केली. त्यानंतर यातील 3 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर 54 लोकांना क्वारंटाइन करण्यात आले. दरम्यान परिसरातील इतर कोणाच्या संपर्कात हे कुटुंबिय आले आहेत का, याची चौकशी आरोग्य विभाग आणि पोलीस करत आहेत. वाचा-सांगा कसं जगायचं? लॉकडाऊने सर्व मार्ग बंद केले, FB पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या देशात कोरोनाच्या मृत्यूदरात वाढ भारतात कोरोनाचा फैलाव जलद गतीने होत आहे. त्यामुळं सध्या निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्या ही एकूण रुग्णांपेक्षा कमी आहे. परिणामी भारतातील मृत्यूदर हा झपाट्याने वाढत आहे. भारतात निरोगी होणाऱ्या रुग्णांची संख्या 9% आहे तर, मृतांची संख्या 2.5% आहे. येत्या काळात ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार भारताच्या लोकसंख्येच्या दृष्टीने सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी क्लस्टर आउटब्रेकमुळे भारतात रुग्णांची संख्या वाढू शकते.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या