मुंबई, 02 एप्रिल : कोरोनासंदर्भात धक्कादायक घटना महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 दिवसाच्या मुलाला आणि त्याच्या 26 वर्षाच्या आईला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. हॉस्पिटलमध्ये आई आणि मुलाला तोच बेड देण्यात आला आहे, ज्यावर काही दिवसांपूर्वी कोविड -19 पासून पीडित व्यक्तीला दाखल करण्यात आले होते. यानंतर, आई आणि मुलाला कुर्ला भाभा रुग्णालयात हलविण्यात आले आणि नंतर ते मुंबईतील कोरोना वारायस संबंधित प्रकरणांचे नोडल केंद्र कस्तुरबा गांधी रुग्णालयात पाठविण्यात आले. इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, एका डॉक्टरने कॉल करून त्यांना कोरोना विषाणूची तपासणी करण्यास सांगितले असता हा सगळा प्रकार उघड झाल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. ते म्हणाले की, चेंबूर हॉस्पिटलमधील कोणत्याही कर्मचार्यांकडून आई व मुलाला कोणतीही मदत केली गेली नाही. नंतर त्याला दुसर्या खोलीत हलविण्यात आले. कस्तूरबा गांधी रुग्णालयात नवजात मुलाच्या वडिलांनाही अलग ठेवण्यात आले आहे. या रुग्णालयात 120 पेक्षा जास्त रुग्णांवर कोविड -19 उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 338 प्रकरणं गुरुवारी आणखी तीन लोकांना महाराष्ट्रात कोरोना विषाणूची लागण झाली. यासह राज्यात कोविड -19 ची प्रकरणे वाढून 338वर पोहोचली आहेत. एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, या तिघांपैकी दोघे पुण्यातून तर एक बुलडाण्याहून आले आहेत. बुधवारपर्यंत महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या 335 घटना घडल्या असून यामध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. मुंबईत कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 12 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. राज्याच्या राजधानीत कोरोनरी विषाणूचे सर्वाधिक 181 रुग्ण आहेत तर पुण्यात 50 रुग्ण आढळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)








