लखनऊ, 02 एप्रिल : कोरोनाची धास्ती लोकांनी इतकी घेतली आहे की माणसाला नुसती शिंक जरी आली तरी जवळचे लोक दूर पळतात. अनेक ठिकाणी अशा घटनाही घडल्या आहेत. पण याच भीतीमुळे एका 5 महिन्याच्या चिमुकल्याचा जीव गेला. लखनऊनमधील जानकीपूर इथं राहणाऱ्या निशांत सिंग सेंगर यांच्या मुलाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. मुलाला दूध पाजताना त्याच्या श्वसननलिकेत दूध अडकलं. त्यानंतर मुलाला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. मुल रडायला लागल्यानं त्याला शांत करण्यासाठी प्रयत्न केला मात्र ते थांबेना. तेव्हा मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं.
सतत रडत असल्यानं मुलाला खाजगी रुग्णालयाकडे घेऊन गेले पण तिथं कुलुप होतं. शेवटी त्यांना जवळच्याच एका खाजगी रुग्णालयाचा पत्ता मिळाला. मात्र ते रुग्णालयही बंदच होतं. त्यानंतर आणखी एका रुग्णालयाबाबत माहिती मिळताच तिथं घेऊन गेले. त्याठिकाणी डॉक्टरही होते पण मुलाचं दुर्दैव साथ सोडत नव्हतं. मुलाची परिस्थिती पाहून डॉक्टरांना मुलाला कोरोना झाल्याचा संशय आला.
कोरोचा संशय आल्यानं डॉक्टरांनी मुलाला हात लावण्यास नकार दिला. त्यांनी केवळ औपचारिकता म्हणून काही औॅषधं दिली आणि ती मुलाला देण्यास सांगितलं. मुलाच्या वडिलांनी त्याला तपासा अशी विनंती डॉक्टरांकडे केली मात्र त्यांचे काही ऐकून घेतलं नाही. मुलाला घेऊन घरी आल्यानंतर त्याला औषध पाजताच आणखी त्रास होऊ लागला. त्यामुळे जोरात रडायला सुरुवात केली. मुलाची ही अवस्था पाहून निशांत सिंग आणि त्यांची पत्नीही घाबरली. त्यांनी पुन्हा एकदा मुलासह रुग्णालय गाठले.
हे वाचा : सांगा कसं जगायचं? लॉकडाऊने सर्व मार्ग बंद केले, FB पोस्ट लिहून तरुणाची आत्महत्या
रुग्णालयात गेल्यानंतर डॉक्टरांनी यावेळी थोडी माणुसकी दाखवली. त्यांनी मुलाला तपासले तेव्हा त्याच्या श्वसन नलिकेत दूध अडकल्याचं समोर आलं. डॉक्टरांनी श्वसन नलिकेतील दूध काढलं पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्या चिमुकल्याचे प्राण आधीच निघून गेले होते. कोरोनाच्या धास्तीमुळे एका निरागस जीवाचा असा अंत काळीज पिळवटून टाकणारा होता.
हे वाचा : नवजात बाळ आणि आईला दिला कोरोना रुग्णाचा खाली झालेला बेड, दोघे पॉझिटिव्ह मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.