देशाची पहिली इंटरनेट कार MG Hector चं बुकिंग सुरू, 'हे' आहेत फीचर्स

देशाची पहिली इंटरनेट कार एमजी हेक्टर ( MG Hector )चं बुकिंग आजपासून ( 4 जून ) सुरू झालंय.

News18 Lokmat | Updated On: Jun 4, 2019 04:06 PM IST

देशाची पहिली इंटरनेट कार MG Hector चं बुकिंग सुरू, 'हे' आहेत फीचर्स

मुंबई, 04 जून : देशाची पहिली इंटरनेट कार एमजी हेक्टर ( MG Hector )चं बुकिंग आजपासून ( 4 जून ) सुरू झालंय. कंपनी या महिन्यात ही कार लाँच करणार आहे.कार बुकिंगसाठी 50 हजार रुपये ठेवलेत. MG Motor भारतात 120 केंद्रांतून बुकिंग सुरू करेल आणि सप्टेंबर 2019पर्यंत देशभरात 250 टच पाॅइंट्सपर्यंत विस्तार केला जाईल. हेक्टर दिसायला मोठी आहे. तिची लांबी 4655 mm, रुंदी 1835 mm आणि उंची 1760 mm आहे. एसयुव्हीच्या फ्रंटमध्ये क्रोम फिनिशसोबत काळ्या रंगाचं ग्रिल आहे. त्यामुळे कार समोरून शानदार दिसते.

देशाची पहिली इंटरनेट कार

एमजी हेक्टर इंटरनेटशी जोडली आहे. हेक्टरमध्ये नेक्स्ट जनरेशन आॅटोमोटिव्ह असिस्टंट आहे. ते 100 टक्के बटण फ्री आहे. ती आवाज ओळखू शकते. MG Hectorमध्ये iSmart इंटरफेस आहे. तो साॅफ्टवेअर, हार्डवेअर आणि कनेक्टिव्हिटी पर्याय घेऊन येतो. MG Hector ग्लेज रेड, बर्गंडी रेड, स्टॅरी ब्लॅक, आॅरोरा सिल्व्हर आणि कँडी व्हाइट रंगांमध्ये उपलब्ध आहे.

2.60 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा दर महिन्याला 40 हजार रुपये


Loading...

इंटिरियर

MG Hector मध्ये प्रीमियम क्वालिटी इंटिरियर असेल. डॅशबोर्ड साॅफ्ट टच मटेरियल असेल. स्टीयरिंग आणि गियर लीवरच्या नाॅबवर व्हील लेदरचं रॅपिंग आहे. सोबत सीटही लेदरचीच असेल. एमजी हेक्टर 10.4 इंचाचं व्हर्टिकल ओरिएंटेड टच स्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टम आहे. ही सिस्टम Android Auto आणि Apple CarPlay दोघांनाही सपोर्ट करते.सोबत कंपनीचं iSmart इंटरफेसही असेल. त्याला जोडलेले बरेच स्मार्ट फीचर्स असतील.

'ही' कंपनी देतेय पुरुष कर्मचाऱ्यांना भर पगारी पॅटर्निटी रजा

बाहेरून कारचा लूक

ही कार बाहेरून SUV चायनीज कार Baojun 530 सारखी दिसते. समोर LED डेटाइम रनिंग लॅम्प्स, मुख्य हेडलॅम्प्सच्या वर दिलेत. सोबत मोठं क्रोम ग्रिल आहे. बाजूला SUVचं डिझाइन दिलंय. मागे डिझाइनमध्ये LED टेल लॅम्प्स, faux skid प्लेट मुख्य आहे.

MHT-CET निकाल जाहीर; इथे पाहा निकाल


इंजिन

एमजी हेक्टर पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्ये मिळेल. कारचं पेट्रोल इंजिन 1.5- लीटर आहे. त्याची पाॅवर 143hp आहे आणि 250Nm टॉर्क जेनरेट करते. 2.0- लीटर डिझेल इंजिन 170hp पाॅवर आणि 350Nm टॉर्क जेनरेट करतात. दोन्ही इंजिन बीएस 4 आहे. पेट्रोल इंजिनमध्ये 6- स्पीड आॅटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय आहे.

MG Hecotr कारसाठी चोविस तास असिस्टंट उपलब्ध असेल. जर अपघात झालाच तर एअरबॅग्ज आपोआप उघडतील. शिवाय मेसेजही जाईल आणि आणीबाणीच्या काळात काय करावं याही सूचना मिळतील.


VIDEO: प्रकाश आंबेडकरांनी राजू शेट्टींना दिली 'ही' ऑफर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 4, 2019 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...