2.60 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा दर महिन्याला 40 हजार रुपये

2.60 लाख रुपये गुंतवून सुरू करा 'हा' व्यवसाय आणि कमवा दर महिन्याला 40 हजार रुपये

कमी पैशात असा एक व्यवसाय करता येईल. या व्यवसायाची मागणी कधी कमी होत नाही.

  • Share this:

मुंबई, 04 जून : तुम्हाला नवा व्यवसाय करायचाय? शिवाय जास्त पैसेही गुंतवायचे नाहीत. तर मग कमी पैशात असा एक व्यवसाय करता येईल. तुम्ही 2.60 लाख रुपये गुंतवणूक करायला तयार असाल, तर तुम्ही महिन्याला 40 हजार रुपये कमाई करू शकता. या व्यवसायाची मागणी कधी कमी होत नाही. डिटर्जंट पावडर आणि साबणाची वडी याचा वापर घरोघरी रोज होतो. याला खूप मागणीही आहे.

किती कराल गुंतवणूक?

पंतप्रधान मुद्रा स्कीम ( PM Mudra Scheme )च्या अंतर्गत डिटर्जंट पावडर आणि साबणाची वडी बनवण्याचं युनिट सुरू करायला तुम्हाला 2.60 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. स्कीमप्रमाणे तुम्ही अर्ज केलात, तर तुम्हाला 3.16 लाख रुपये टर्म लोन आणि 4.61 लाख रुपये वर्किंग कॅपिटल कर्ज सहज मिळू शकतं.

'ही' कंपनी देतेय पुरुष कर्मचाऱ्यांना भर पगारी पॅटर्निटी रजा

MHT-CET निकाल जाहीर; इथे पाहा निकाल

किती येईल खर्च?

निश्चित किंमत - 4.21 लाख रुपये ( यात मशीन्स आणि इतर सामुग्री यांचा समावेश आहे )

वर्किंग कॅपिटल - 6.15 लाख रुपये ( यात एक महिन्याचा कच्चा माल, पगार आणि लागणारा खर्च आहे )

एकूण खर्च - 10.37 लाख रुपये

कशी होईल कमाई?

10.37 लाख रुपयांच्या योजना खर्चावर जो आराखडा तयार केलाय त्यावर वर्षाला 81,00,000 रुपये आर्थिक उलाढाल होऊ शकते. यात साबणाच्या वड्यांची विक्री 21 लाख रुपये आणि डिटर्जंट पावडरची विक्री 60 लाख रुपये आहे.

हुंडाबळी? शिरूरमध्ये विवाहितेची आत्महत्या, पण मुलीची हत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

एकूण नफा - दर वर्षी 5.37 लाख रुपये

निव्वळ नफा - दर वर्षी 5.15 लाख रुपये ( कर भरल्यानंतर )

महिन्याचा नफा - 40 हजारापेक्षा जास्त

असा करा अर्ज

पंतप्रधान मुद्रा योजनेअंतर्गत तुम्ही कुठल्याही बँकेत अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला फाॅर्म भरावा लागेल. त्यात तुमचं नाव, पत्ता, शिक्षण, आताची कमाई, किती कर्ज हवं या गोष्टी नमूद कराव्या लागतील. यासाठी प्रोसेसिंग फी आणि गॅरेंटी फी द्यावी लागणार नाही.

SPECIAL REPORT: जीव मुठीत घेऊन हंडाभर पाण्यासाठी महिलांची कसरत

First published: June 4, 2019, 1:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading