• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • चुकून पाकिस्तानात गेला, 2 वर्ष जेलमध्ये राहून युवक परतला भारतात; चेहरा पाहून आई म्हणाली...

चुकून पाकिस्तानात गेला, 2 वर्ष जेलमध्ये राहून युवक परतला भारतात; चेहरा पाहून आई म्हणाली...

दोन वर्षांपूर्वी पंजाबच्या अमृतसर येथील बॉर्डरवरुन (Wagah border) पाकिस्तानात पोहोचलेला मनोरुग्ण युवक बारेलाल आदिवासी (32) अखेर भारतात (India) परतला आहे. तो मागील चार वर्षांपासून बेपत्ता होता

 • Share this:
  नवी दिल्ली 28 जून : दोन वर्षांपूर्वी पंजाबच्या अमृतसर येथील बॉर्डरवरुन (Wagah border) पाकिस्तानात पोहोचलेला दमोहच्या (Damoh) नोहटा ठाण्याच्या शीशपूर पटी येथील मनोरुग्ण असलेला युवक बारेलाल आदिवासी (32) अखेर भारतात (India) परतला आहे. तो मागील चार वर्षांपासून बेपत्ता होता. 2019 मध्ये तो पाकिस्तानमध्ये (Pakistan) पकडला गेल्याची पुष्टी झाली. परराष्ट्र मंत्रालयाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाने छायाचित्रांच्या आधारावर त्याच्या आई, वडील आणि भाऊ यांची ओळख पटवली होती. बारेलालला परत आणण्यासाठी दोन वर्षांपासून सुरू झालेली मोहीम आता अखेर यशस्वी झाली आहे. 23 जूनला पाकिस्तानने अटारी सीमेवर अमृतसर येथे बारेलालला भारताच्या स्वाधीन केले. अमृतसर रेडक्रॉस सोसायटीने बारेलालला दमोह पोलीस व कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. इकडे, चार वर्षांनंतर बारेलालला गावात परतल्यानंतर, इथे आनंद साजरा केला जात आहे. रविवारी गावात गर्दी जमली. दोन दिवसांपूर्वी नोहटा कॉन्स्टेबल आलोक भारद्वाज बारेलालला वडील सुबी आदिवासी आणि भाऊ पदम यांच्यासह अमृतसरहून घेऊन घरी परतले. बारेलाल गावात परतल्यामुळे आई लक्ष्मीबाईंसह सर्व सदस्य आनंदी आहेत. लक्ष्मीबाई म्हणतात की आता आशाही राहिली नव्हती. रात्री झोपही येत नसे. मजुरी करून पैसे जमा केले जेणेकरुन त्याला शोधण्यात त्रास होणार नाही, परंतु सरकार आणि पोलिसांनी मदत केली आणि माझ्या मुलाला माझ्यापर्यंत पोहोचवलं. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केली माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची हत्या लक्ष्मीबाईं म्हणतात, की पूर्वी त्यांचा मुलगा अशक्त होता, परंतु जेव्हा तो परत आला तेव्हा तो लठ्ठ झाला आहे. सरकारने बारेलालच्या आजारावर उपचार करण्यासाठी मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे. बारेलालचे वडील सुब्बी म्हणतात, की पूर्वी बारेलाल घरातून बाहेर जायचा तेव्हा आजूबाजूलाच सापडायचा, पण यावेळी तो परत आलाच नाही. तो पाकिस्तानात जाईल असं आम्हाला वाटलं नव्हतं. 14 नोव्हेंबर 2019 रोजी पाकिस्तानच्या बहावलपूर येथे दोन तरुणांना अटक करण्यात आली. यात बारेलाल व प्रशांत बेंदम अशी दोन तरुणांची नावे समोर आली. चौकशीदरम्यान बारेलाल हा मध्य प्रदेशातील दमोहमधील शीशपूरचा रहिवासी असल्याचे आढळले. यावर परराष्ट्र मंत्रालयाने प्रशासन व पोलिसांकडून माहिती घेतली. नोहटा पोलिसांनी शीशपुरात जाऊन फोटोच्या आधारे बारेलालबद्दल माहिती गोळा केली. फोटोत दिसत असलेला युवक बारेलालच असल्याची कुटुंबीयांनी पुष्टी केली. मात्र, त्याला पाकिस्तानमधून परत आणण्यास बराच काळ लागला. कोरोना संसर्गामुळे प्रक्रिया वेळेवर पूर्ण होऊ शकली नाही. आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात कोविड प्रतिबंधक नियमांचे सर्रास उल्लंघन बरेलाल मानसिक रूग्ण आहे. तो दमोहहून पाकिस्तानात कसा पोहोचला? त्याबद्दल काही स्पष्ट सांगू शकत नाही. त्याला एवढेच माहिती आहे की तो दमोहहून जबलपूरला आणि तेथून ट्रेनमध्ये बसून पुढे गेला. कोणत्या ट्रेनमध्ये बसला, कोठे उतरला आणि पाकिस्तानमध्ये जाण्याचा मार्ग कसा सापडला, याबद्दल तो काहीही सांगू शकत नाही. आपल्याला याठिकाणी पाकिस्तानच्या तुरुंगात ठेवल्याचे तो सांगतो. याठिकाणी त्याला विटा बनवण्याचं काम लावल्याचंही त्यानं सांगितलं. बरेलाल पाकिस्तानातून कपडे, खाद्यपदार्थ आणि दैनंदिन वापराच्या वस्तू घेऊन आला आहे. त्याच्याकडे दोन पठानी सूट आहेत, त्यापैकी एक त्याने परिधान केला आहे. भाऊ पदम आदिवासींनी सांगितले की, यापूर्वीसुद्धा एकदा बरेलाल दिंडोरीकडे गेला होता. बर्‍याच वर्षांनंतर तो घरी परतला. दहावीत नापास झाल्यानंतर त्याची मानसिक स्थिती बिघडली होती. 2006 मध्ये तो मजूर म्हणून काम करण्यासाठी मित्र भागचंद्रसमवेत दिल्लीला गेला होता. तिथून त्याला परत आणण्यात आलं होतं. एसपी डीआर तेनिवार यांनी सांगितले की प्रक्रिया आधीपासूनच सुरू होती. परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्र आलं होतं. यानंतर नोहटा पोलीस स्टेशनच्या हवालदाराला घरातील सदस्यांसह बरेलालला माघारी आणण्यासाठी पाठविले होते. कुटुंबातील दोन सदस्य हवालदारांसह अमृतसरला गेले होते. तिथून ते बरेलला घेऊन परत आले आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: