• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात कोविड प्रतिबंधक नियमांना केराची टोपली

आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात कोविड प्रतिबंधक नियमांना केराची टोपली

महाराष्ट्रात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा दोका लक्षात घेता कठोर निर्बंध लागू कऱण्यात आले आहे.

  • Share this:
जालना, 27 जून: डेल्टा प्लस (Delta Plus) आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या (Coronavirus third wave) पार्शवभूमीवर राज्यात पुन्हा निर्बंध (restrictions in Maharashtra) लावण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन, महानगरपालिकेकडून सुद्धा वेगवेगळे निर्बंध लागू केले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्याचे वारंवार आवाहन करताना दिसत आहेत. मात्र, असे असताना आरोग्यमंत्र्यांच्या जालन्यात कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन करण्यात आल्याचं दिसत आहे. कोविड प्रतिबंधात्मक नियमांना केराची टोपली दाखवित साप्ताहिक बाजार भरविण्यात आला. राज्यभरातील अधिकांश जिल्ह्यात कोविड निर्बंधांची अंमलबजावणी उद्यापासून केली जाणार असली तरी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या जालना जिल्ह्यात मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी करून कोविड निर्बंध आज पहाटे 5 वाजेपासून लागू केले. या आदेशानुसार सोमवार ते शुक्रवार अत्यावश्यक सेवा आणि इतर दुकानांना दुपारी 4 वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. तर शनिवार आणि रविवार पूर्णपणे कडक विकेंड लॉकडाऊन पाळण्याचे आदेश देण्यात आले. डेल्टा प्लसचा धोका; आजपासून राज्यात नवे निर्बंध आजपासून लागू झालेल्या निर्बंधानुसार रविवार असल्याने आज जालन्यात संपूर्ण लॉकडाऊन अपेक्षित असताना जुना जालन्यातील गांधी चमन भागात साप्ताहिक बाजार भरविण्यात आला. इतकेच नाही तर खरेदीसाठी नागरिकांची सकाळपासून गर्दी केली होती. शहरातील अनेक दुकाने, हातगाड्या देखील राजरोसपणे सुरु असल्याचं पहायला मिळालं. आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या जालन्यात कोविड निर्बंधांना अशा प्रकारे केराची टोपली दाखविली जात असून नगर पालिका आणि पोलीस मात्र याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा करताना दिसत आहेत.
Published by:Sunil Desale
First published: