रेल्वेने रद्द केल्या 500 हून अधिक गाड्या, खोळंबा होणार नाही याची खात्री करूनच घराबाहेर पडा

रेल्वेने रद्द केल्या 500 हून अधिक गाड्या, खोळंबा होणार नाही याची खात्री करूनच घराबाहेर पडा

भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज 19 मार्च रोजी अनेक रेल्वे रद्द केल्या आहेत. एकूण 524 ट्रेन रद्द केल्या आहेत ज्यामध्ये जनशताब्दी, सुपरफास्ट ट्रेन, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजरचा समावेश आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च :  भारतीय रेल्वेने (Indian  Railway) आज 19 मार्च रोजी अनेक रेल्वे रद्द केल्या आहेत. विविध कारणांसाठी या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. या रद्द झालेल्या रेल्वेंच्या यादीमध्ये एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन्स तसंच काही स्पेशल रेल्वेसेवांचा समावेश आहे. रेल्वेकडून मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे आज एकूण 524 ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये जनशताब्दी, सुपरफास्ट ट्रेन, मेल एक्सप्रेस आणि पॅसेंजर अशा ट्रेन्सचा समावेश आहे.

कोरोनामुळे रद्द झाल्या 80 गाड्या

देशभरामध्ये कोरोनाशी (Coronavirus COVID-19) सर्वांचाच लढा सुरू आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढू लागला आहे. त्यामुळे अनेकांनी प्रवास करणं टाळलं आहे.

(हे वाचा-लढा कोरोनाशी! भारतीय महिलेने बनवलं टेस्टसाठी स्वस्त किट)

प्रवाशांची कमी झालेली संख्या आणि खबरदारीचा उपाय म्हणून भारतीय रेल्वेने बुधवारपर्यंत 80 रेल्वेगाड्या रद्द केल्या होत्या. हजरत निजामुद्दीन ते छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस राजधानी एक्सप्रेस आणि छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेसचाही यामध्ये समावेश आहे.

घराबाहेर पडण्याआधी तपासून रेल्वेबाबत तपासून घ्या

भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन रद्द झालेल्या गाड्यांबाबत तुम्ही माहिती मिळवू शकता. त्याचप्रमाणे प्रत्येक स्टेशनवर रद्द झालेल्या गाड्यांबाबत आवश्यक तेव्हा अनाउन्समेंट करण्यात येत आहे. प्रवासी 139 या क्रमांकावर मेसेज करून देखील रद्द झालेल्या रेल्वे गाड्यांबद्दल माहिती घेऊ शकतात.

पूर्ण पैसे परत मिळणार

एखाद्या गाडीसाठी तुम्ही रिझर्व्हेशन केले असेल आणि ती गाडी जर रद्द झाली तर तुम्हाल त्याचा पूर्ण रिफंड मिळणार आहे. त्यामुळे जर तुमची गाडी रद्द झाली असेल तर इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी तुम्ही दुसऱ्या ट्रेनचं बुकिंग करू शकता

First published: March 19, 2020, 1:59 PM IST

ताज्या बातम्या