बडोदा, 19 मार्च : भारतामध्ये कोरोनाबाबत घेतली गेलेली काळजी आणि नियंत्रणासाठी उचलली जाणारी पावलं, याचं संपूर्ण जगभरातून कौतुक होत आहे. भारत आणि चीन दोन्ही देशांची मिळून 3,488 किलोमीटरची सीमारेशा आहे. तरीही भारतामध्ये केवळ 3 मृत्यू आणि 169 पॉजिटिव्ह रुग्ण आहेत. हा लढाही आपण जिंकू अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे. त्याकरता अनेक जण आपापल्या पद्धतीने मदत करताना दिसत आहेत. अशीच एक सकारात्मक बातमी गुजरात मधून समोर येत आहे. एका गुजरातमधील मुलीने कोरोना टेस्टसाठी लागणाऱ्या स्वदेशी आणि स्वस्त किटची निर्मिती केली आहे. (हे वाचा- 103 वर्षांच्या आजीची महाभयंकर ‘कोरोना’वर मात, लाखो रुग्णांसाठी प्रेरणा ) देशातील नामांकित फार्मा कंपनी बायोकॉन (Biocon) च्या संस्थापक किरण मजूमदार शॉ यांनी ट्वीट करून अशी माहिती दिली आहे की, कोरोना व्हायरसच्या टेस्टसाठी भारतामध्ये स्वदेशी असणारे असं स्वत आणि सोयीस्कररित्या वापरता येणारं किट तयार करण्यात आले आहे. त्यांनी याबाबत अभिनंदन करणारं ट्वीट केले आहे.
This is a great innovate n make in India story that we must shout out loud at this time of crisis. We need not only depend on imported kits which are being rationed n at prices that are 4X of CoSara kits @amitabhk87 @PMOIndia https://t.co/ygxBh5tKen
— Kiran Mazumdar-Shaw (@kiranshaw) March 19, 2020
गुजरातमधील एमएस विद्यापीठातील बडोद्याचे नामांकित प्राध्यापक मोदी यांची मुलगी मयूरंकीने याचा शोध लावला आहे. त्यांनी हे किट कोएर डाग्नॉस्टिक (Core Dignostic) या कंपनीबरोबर मिळून बनवले आहे. मात्र अद्याप या किटला रेग्युलेटरी परवानगी मिळालेली नाही. (हे वाचा- कोरोनाबाधित इटलीतून मुंबईच्या मुलीची सुटका, वडिलांनी मोदींना म्हटलं ‘बापमाणूस’) किरण मजूमदार शॉ यांनी मयूरंकी यांचं अभिनंदन करताना या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मेक इन इंडियाची कहाणी पुढे नेणारा हा एक उल्लेखनीय उपक्रम आहे. संकटाच्या काळात हा स्वस्त किटला सर्वांपुढे आणण्यासाठी काम करणं आवश्यक आहे. कारण सध्या आपण 4 पटीने महाग असणारे किट (CoSara Kits) परदेशातून मागवत आहोत.