कोरोनाबाबत चीनच्या डॉक्टरांचा भारताला सल्ला, Lockdown नंतर काय करायला हवं?

कोरोनाबाबत चीनच्या डॉक्टरांचा भारताला सल्ला, Lockdown नंतर काय करायला हवं?

भारतात सध्या इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव आणि मृत्यू दर कमी आहे. देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 एप्रिल : कोरोनामुळे जगातील अनेक देशात हाहाकार उडाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन या देशांमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा वाढतच आहे. मात्र यात भारतासाठी दिलासादायक बातमी आहे. भारतात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आणि मृत्यू दरसुद्धा कमी आहे.

भारतात कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी लॉकाडऊन करण्यात आलं. त्यामुळे देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याचं चीनमधील सेंट मायकल रुग्णालय शांघायचे मेडिकल डायरेक्टर डॉक्टर संजीव चौबे म्हणाले. 'आज तक'शी बोलताना त्यांनी भारतात कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या प्रयत्नांचं कौतुक केलं.

डॉक्टर संजीव म्हणाले की, कोरोना व्हायरसवर कोणतंही औषध नसल्यानं लॉकडाऊन महत्वाचं होतं. भारताने ते आधी करून मोटा निर्णय घेतला. चीन आणि भारतात लोकसंख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे या रोगाला रोखण्यासाठी लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही. हॉटस्पॉटच्या भागात लॉकडाऊननंतरही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करायला हवं असा सल्लाही त्यांनी दिला.

हे वाचा : कोरोनातून बरं झाल्यावर योद्धा घरी गेला, दारातूनच बायको मुलांना पाहिलं आणि...

भारतातील काही राज्यांमध्ये कोरोनाला रोखण्यात यश मिळालं आहे. संजीव चौबे म्हणाले की, बिहार, ओडिशा, झारखंड या राज्यात कोरोनाचा प्रसार कमी आहे. ज्या भागात मलेरियाचे रुग्ण जास्त आहेत तिथं कोरोनाचा प्रभाव कमी दिसून येतो असंही ते म्हणाले.

हे वाचा : कोरोनाच्या या आकड्यांमुळे वाढणार राज्य सरकारची चिंता, मुंबईत धोक्याची घंटा कायम

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे हायड्रोक्सीक्लोरोक्वीनची मागणी केली होती. याबाबत सांगताना चौबे म्हणाले की, याचा प्रयोग सध्या चीनमध्येही सुरू आहे. मात्र जेव्हा रुग्ण व्हेंटिलेटरवर असतात तेव्हा फारसा परिणाम होत नाही. त्यामुळं सध्या तरी कोरोनाला रोखू शकेल असं औषध किंवा उपचार नाही.

हे वाचा : दुबईहून भारतात पोहोचला मुलाचा मृतदेह; आईवडिलांच्या ताब्यात न देताच पाठवला परत

संकलन, संपादन - सूरज यादव

First published: April 25, 2020, 9:25 PM IST

ताज्या बातम्या